व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सीसीटीव्हीमुळे गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत : दत्तात्रय दराडे

पुसेसावळी | पुसेसावळी पोलीस दुरक्षेत्रा अंतर्गत येणार्‍या वडगावमध्ये ग्राम पंचायतीच्या वतीने सी. सी. टीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे गुन्हे उघडकीस येण्यास पोलीस यंत्रणेला मदत होणार आहे. तसेच गावामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल. तरी गावामध्ये चोरीचे प्रमाण कमी होण्यास सी.सी. टीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे मदत होणार असल्याचे मत औंध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय दराडे यांनी मांडले. जयराम स्वामी वडगाव (ता.खटाव ) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये बसविण्यात आलेल्या सी.सी.टीव्ही कॅमेरांच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पुसेसावळी दुरक्षेत्राचे पोलीस निरिक्षक गंगाप्रसाद केंद्रे, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक संतोष घार्गे, सरपंच समीना मुलाणी, उपसरपंच शुभांगी घार्गे,ग्रामविकास अधिकारी आर.एन.जगताप, पोलीस नाईक राहुल सरतापे, पोलीस कॉन्स्टेबल महेश जाधव, पोलीस पाटील किशोर नागमल आदिंसह प्रमुख उपस्थिती होती.

सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक संतोष घार्गे म्हणाले की, गावातील सुरक्षा विषयी सी.सी.टीव्ही कॅमेरे महत्त्वाचे असून गावातील लोकांना त्याचा फायदा होईल तसेच पोलीस आपल्यासाठी मदत करत असतात जर गावात एखादा गुन्हा घडत असेल तर सी.सी.टीव्ही कॅमेराच्या माध्यमातून गुन्हा उघडकीस आणण्यास मदत होईल. या कार्यक्रमास विकास घार्गे, माजी चेअरमन सुनिल घार्गे, सचिन जांदे, शिकंदर शिकलगार, राजेंद्र घार्गे, वलीशा मुलाणी, अनिल निकम, सुनिता घार्गे दशरथ बरकडे, महादेव नागमल, अभिजित नागमल, राजाराम पवार अनिल घार्गे आदीसह गावातील ग्रामस्थ व महिलावर्ग उपस्थित होते.