व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करा : ज्ञानेश्वर खिलारी

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथे जिल्हा परिषदेमार्फत शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येतो. त्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करा, अशा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिल्या.

जिल्हा परिषद ठराव समितीची सभा स्थायी समिती सभागृहामध्ये ज्ञानेश्वर खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, रोहिणी ढवळे, किरण सायमोते, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, बांधकाम उत्तरचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, बांधकाम दक्षिणचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अरुणकुमार दिलपाक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी होऊन तो यशस्वी करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना श्री. खिलारी यांनी दिल्या. जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषद सेसचा निधी विहित वेळेत खर्च करावा. यावेळी विषयपत्रिकेसह ऐनवेळच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. कृषी विकास अधिकारी विजय माईणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली बडदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.