Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Central Bank of India : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ केली गेली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली गेली आहे. यामध्ये आता फायनान्स कंपन्या देखील सामील होत आहेत. यादरम्यानच, आता सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.

Central Bank of India Changes FD Rates | Check Latest Rates Here

10 ऑक्टोबर 2022 पासून नवीन दर लागू

आता बँकेकडून 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 2.75% ते 5.60% पर्यंत व्याजदर दिला जाईल. त्याच वेळी, 999 दिवसांच्या FD वर आता जास्तीत जास्त 6.25% व्याजदर मिळेल. तसेच 10 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन दर लागू होतील. गेल्या काही वर्षांमध्ये एफडीवरील व्याजदर लक्षणीयरीत्या खाली आले होते. मात्र, आता व्याजदरात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. Central Bank of India

Independence Day Special FD Scheme Launched By SBI Bank Of Baroda And Axis Bank With Higher Interest Rates | Independence Day Special FD Scheme: आजादी के अमृत महोत्सव पर इन बैंकों ने

Central Bank of India च्या एफडीवरील नवीन व्याज दर

>> 7 ते 14 दिवसांच्या FD वर 2.75%
>> 15 ते 30 दिवसांच्या FD वर 2.90%
>> 31 ते 45 दिवसांच्या FD वर 3.00%
>> 46 ते 59 दिवसांच्या FD वर 3.50%
>> 60 ते 90 दिवसांच्या FD वर 3.50%
>> 91 ते 179 दिवसांच्या FD वर 4%
>> 180 – 270 दिवसांच्या FD वर बँक 4.65%
>> 271-364 दिवसांच्या FD वर बँकेला 4.75%
>> 1 वर्ष आणि 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर 5.55%
>> 2 वर्षे – 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.60%
>> 3 वर्षे आणि 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर 5.50%
>> 5 वर्षे आणि त्याहून जास्त मुदतीच्या FD वर 5.60%
>> स्पेशल 555-दिवसांच्या कालावधीवर 5.75%,
>> 999-दिवसांच्या कालावधीवर 6.25%.

Types of fixed deposit: How to Choose the Right FD | IDFC FIRST Bank

अनेक बँकांनी मुदत ठेवींचे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये (FD Rates) वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे. Central Bank of India

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.Central Bank of India

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.centralbankofindia.co.in/en/interest-rates-on-deposit

हे पण वाचा :
Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात साप्तहिकरीत्या वाढ, गेले आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती कशी होती ते जाणून घ्या
FD Rates : खासगी क्षेत्रातील ‘या’ बँकेने फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन दर
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Post Office च्या बचत योजनांवर आता मिळणार जास्त व्याज !!!
Business : घरबसल्या ‘या’ 5 मार्गांनी दरमहा करता येईल हजारोंची कमाई !!!