Central Bank Of India Recruitment 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मेगाभरती, तब्बल 3000 पदांची होणार भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Central Bank Of India Recruitment 2024 | बँकेमध्ये नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. अनेकजण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बँकेच्या नोकरीसाठी धडपड करत असतात. परंतु अनेक प्रयत्न करूनही बँकेमध्ये त्यांना नोकरी लागत नाही. परंतु आता आम्ही तुमच्यासाठी बँकेची एक बंपर भरती घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून एक नवीन भरती निघालेली आहे.या बँकेत जर तुम्हाला नोकरी लागली तर थेट केंद्र शासनाची तुम्हाला नोकरी लागेल. त्यामुळे ही उमेदवारांसाठी एक मोठी संधी आलेली आहे.

रिक्त पदे तपशील

सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून ही एक मोठी मेगाभरती राबवली जात आहे. कारण या भरतीमध्ये तब्बल 3000 शिकाऊ उमेदवारांसाठी भरती होणार आहे. या सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि जेव्हाही भरती जाहीर केली त्यावेळी त्यांनी 10 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख ठेवली होती.

परंतु उमेदवारांचे अर्ज पाहता आणि त्यांचा उत्साह पाहता सेंट्रल बँक ऑफ इंडियाने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मार्चपर्यंत वाढवलेली आहे. त्यामुळे तुमच्या हातात अजून काही दिवस आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये (Central Bank Of India Recruitment 2024) अर्ज करण्यासाठी तुम्हाला 500 रुपये ही फी असणार आहे त्यामुळे तुम्ही अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने ही फी भरायची आहे.

वयोमर्यादा | Central Bank Of India Recruitment 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये तुम्हाला अर्ज करायचे असेल तर तुमचे वय हे कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 28 असणे खूप गरजेचे आहे याच वयोगटातील विद्यार्थी केवळ अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अर्ज करण्यासाठी संबंधित विषयांमध्ये पदवी झालेली असणे गरजेचे आहे.

निवड प्रक्रिया

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये निवड करण्यासाठी सगळ्यात आधी तुमची लेखी परीक्षा घेतली जाईल.
त्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट केली जाईल आणि फायनल मेरिट लिस्टची वाट पाहिली जाईल.
त्यानंतर सगळ्या कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर तुमची भरती होईल.

पगार

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये तुमची भरती झाल्यावर तुम्हाला दर महिन्याला 15 हजार रुपये वेतन दिले जाईल

आवश्यक कागदपत्र

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • निवास प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • पदवी प्रमाणपत्र

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा