सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; लगेच करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 110 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 17 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

भरले जाणारे पद – अधिकारी

पद संख्या – 110 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑक्टोबर 2022

अर्ज फी –
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/PWBD उमेदवार – Rs.175/-+GST

इतर सर्व उमेदवार – Rs. 850/-+GST

आवश्यक शैक्षणिक पात्रता – खालील PDF पहा

असा करा अर्ज –

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
सदर पदांकरिता अधिक माहिती www.centralbankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2022 आहे.

निवड प्रक्रिया –

वरील भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल .
मुलाखतीला येताना आवश्यक असेलेली कागदपत्रे सोबत आणावी.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.centralbankofindia.co.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY