मोदी सरकारचा तेल कंपन्यांना दिलासा; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने डिझेल आणि जेट इंधनावरील अनपेक्षित टॅक्स (Diesel ans ATF tax) कमी करण्याची घोषणा केली आहे. याबाबत सरकारने अधिसूचना जारी करून माहिती दिली आहे. त्यामुळेच महागाईच्या या काळात थोडाफार दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, देशांतर्गत कच्च्या तेलाच्या निर्यातीवरील कर सध्याच्या 4,900 रुपये प्रति टन वरून 1,700 रुपये प्रति टन करण्यात आला आहे. त्याच वेळी, विमान इंधनावरील कर (ATF) प्रति लिटर 5 रुपये वरून 1.5 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. सरकारने पेट्रोलमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोलवर शून्य विंडफॉल कर लागू आहे, तो कायम ठेवण्यात आला आहे. हायस्पीड डिझेलवरील विंडफॉल टॅक्स 8 रुपयांवरून 5 रुपये करण्यात आला आहे.

यापूर्वी 1 जुलै रोजी पेट्रोल-एटीएफवर 6 रुपये आणि डिझेलवर 13 रुपये प्रति लिटर निर्यात शुल्क लावण्यात आले होते. याशिवाय कच्च्या तेलाच्या देशांतर्गत उत्पादनावर प्रतिटन २३२३२५० रुपये विंडफॉल टॅक्स लावण्यात आला आहे.