Wednesday, February 1, 2023

आता लवकरच पेट्रोल-डिझेलही येणार GST च्या कक्षेत; केंद्र सरकारकडून तयारी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र दरकारकडून अनेक गोष्टींना GST लावण्यात आला आहे. इतर गोष्टींप्रमाणे आता पेट्रोल आणि डिझेललाही जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याची महत्वाची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज दिली. केंद्र सरकारकडून तयारी करण्यात आली असून फक्त सर्व राज्यांची याला सहमती दर्शवणे अपेक्षित असल्याचे पुरी यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे. राज्याच्या उत्पन्नाच्या प्रमुख स्त्रोतामध्ये दारू आणि इंधनाचा समावेश असल्याने यावर राज्य सरकार पुढाकार घेत नाहीत.

- Advertisement -

त्यामुळे केंद्र सरकारकडून इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी काय करता येईल याची चाचपणी केली जात आहे. पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे इंधन जर जीएसटीच्या कक्षेत आले तर राज्यांचा जो मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे तो थांबू शकेल. मात्र, इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी राज्यांचे अर्थमंत्री तयार होणार नसल्याचे पुरी यांनी म्हंटले.