भाजप मंत्र्याच्या गाडीला अपघात; कारच्या बोनेटचा चक्काचूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. कर्नाटक येथिल विजयपुरा जिल्ह्यात हा अपघात घडला. साध्वी निरंजन ज्योती यांची कार ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला असून यामध्ये साध्वी निरंजन ज्योती आणि कार चालक जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग-50 वर गुरुवारी रात्री हा अपघात झाला. केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन सिंह शुक्रवारी संध्याकाळी हुबळीहून विजयपुराला जात होत्या. त्याचवेळी त्यांची कार एका ट्रकला धडकली. यामध्ये त्या आणि त्यांचा चालक दोघेही जखमी झालेत. दोघांवरही स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सदर अपघातावेळी ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, देवाच्या आशीर्वादाने मी बरी आणि सुरक्षित आहे असं साध्वी निरंजन ज्योती यांनी अपघातानंतर म्हंटल. चालकाच्या सतर्कतेमुळे आमचा जीव वाचला आणि महत्त्वाचे म्हणजे गाडी ट्रकखाली आली नाही. आम्हाला किरकोळ दुखापत झाली आहे, सर्व काही ठीक असल्याचे त्यांनी सांगितलं.