हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वेचा प्रवास हा अत्यंत स्वस्त आणि आरामदायी मानला जातो. रेल्वेकडून देखील प्रवाशांचा प्रवास चांगला प्रवास होण्यासाठी अनेक सुविधा आणल्या जातात. आपण नेहमीच पाहतो की, रेल्वेमध्ये खूप जास्त गर्दी असते. त्यामुळे अनेक लोक हे विना तिकीट प्रवास करतात. आता रेल्वेने देखील या विना तिकीट प्रवास करणाऱ्या नागरिकांविरुद्ध अनेक कठोर पावले उचललेली आहेत. कारण या प्रवाशांमुळे इतर प्रवाशांना देखील त्रास होतो.
त्यामुळे या प्रवासांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम आता रेल्वेने राबवली आहे. त्यामुळे आता उपनगरीय लोकल एक्सप्रेस, विशेष ट्रेनमध्ये टीसीकडून तिकिटांची तपासणी करण्यात येत आहे. अशावेळी जर एखाद्या व्यक्तीकडून प्रवाशांना त्रास होत असेल, किंवा कोणी नुकसान पोहोचवत असेल, तर रेल्वेकडून त्याची कठोर कारवाई देखील करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे विना तिकीट प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून दंड देखील वसूल करण्यात येत आहे.
एप्रिल आणि मे 2024 या दोन महिन्यांमध्ये विना तिकीट प्रवास करणारे तब्बल 9.4 लाख प्रवासी सापडल्याने त्यांच्याकडून 63.62 कोटींचा दंड वसूल देखील करण्यात आलेला आहे. त्यामुळे रेल्वेच्या महसुला 14.64 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेने अनाधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 4.29 लाख प्रकरणात 28.44 कोटींचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे हा महसूल 2.54 टक्क्याने वाढलेला आहे..
मध्यरेल्वे बरोबर पश्चिम रेल्वेने देखील फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल केलेला आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात 2 महिन्यातच 2.80 लाख रुपये विना तिकीट प्रवास करणाऱ्या लोकांकडून 17.19% रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.