Central Railway Mega Block: मध्य रेल्वे मार्गावर 9 फेब्रुवारीला मेगाब्लॉक ; वेळापत्रक पाहूनच प्रवास करा

0
1
Central Railway Mega Block
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Central Railway Mega Block – जे उद्या रेल्वे मार्गाने प्रवास करणार आहेत त्यांच्यासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई विभागाकडून 9 फेब्रुवारी 2025 रोजी उपनगरीय रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे रेल्वे प्रवास करणाऱ्यांना काही असुविधा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक बघूनच प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर चला या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

माटुंगा-मुलुंड जलद मार्गावर ब्लॉक –

सकाळी 10:58 वाजता ते दुपारी 3:10 वाजेपर्यंत माटुंगा-मुलुंड जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या कालावधीत माटुंगा येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानकावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील.

ठाणे येथून सुटणाऱ्या गाड्या (Central Railway Mega Block)

सकाळी 11:25 वाजता ते 3:27 वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावर वळवल्या जातील आणि माटुंगा स्थानकावर परत जलद मार्गावर वळवल्या जातील.

डाउन सेवा रद्द राहतील –

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी 11:16 वाजता ते 4:47 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील आणि सकाळी 10:48 वाजता ते 4:43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाउन सेवा रद्द राहतील. त्याचसोबत , पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत दरम्यान विशेष सेवा –

ब्लॉक (Central Railway Mega Block) कालावधी दरम्यान पनवेल-कुर्ला-पनवेल विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत. यासाठीच हार्बर लाईनवरील प्रवाशांना मेन लाईन आणि वेस्टर्न लाईन स्टेशनवरून सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. या सर्व ब्लॉकमुळे प्रवाशांना अनावश्यक समस्यांपासून वाचण्यासाठी वेळापत्रक पाहूनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.