Central Railway Megablock : मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक ; पुण्याकडे जाणाऱ्या 19 रेल्वे गाड्या केल्या जाणार रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Central Railway Megablock : राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम देखील मध्य रेल्वेवर झाला आहे. पावसाच्या दिवसात विशेषतः कोकण रेल्वेला मोठा फटका बसतो. त्यामुळे कोकण रेल्वे दरड कोसळून बंद पडण्याचं गाऱ्हाण नेहमीचंच आहे. मात्र आता मध्य रेल्वे कडून सहा दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती आहे. या मेगाब्लॉक चा परिणाम पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर होणार असून यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या 19 रेल्वे गाड्या रद्द केल्या जाणार आहेत तर 22 एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग बदलले ( Central Railway Megablock) जाणार आहेत. त्यामुळे मुंबई – पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये सहा दिवसांचा मेगाब्लॉक असणार आहे. दौंड रेल्वे स्थानकावरील विविध कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक दिनांक 27 जुलै ते १ ऑगस्ट या दरम्यान असणार आहे. या काळामध्ये अनेक गाड्या रद्द करण्यात येणाऱ्या तर काही गाड्यांचे मार्ग देखील बदलले (Central Railway Megablock) जाणार आहेत.

पुणे विभागातल्या 19 गाड्या रद्द (Central Railway Megablock)

मध्य रेल्वेच्या सहा दिवसांच्या ब्लॉकचा परिणाम पुणे विभागातील रेल्वे गाड्यांवर होणार असून या ब्लॉग दरम्यान 19 गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. तर 22 एक्सप्रेस गाड्यांचे मार्गही बदलले जाणार आहेत. सोलापूर – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस तीन दिवसांसाठी रद्द करण्यात येणार आहे. याबरोबरच सोलापूर रेल्वे विभागातून काही गाड्यांच्या मार्गामध्ये बदल करण्यात येणार असून लोकमान्य टिळक टर्मिनस ते विशाखापट्टणम एक्सप्रेस ही गाडी 29 जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान मिरज – कुर्डुवाडी मार्गे रवाना होईल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बंगळुरू एक्सप्रेस ही गाडी ब्लॉक काळात पुणे- मिरज- कुर्डूवाडी मार्गे रवाना केली जाईल. त्याबरोबरच बंगळुरु- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल एक्सप्रेस 27 ते 31 जुलै पर्यंत कुर्डूवाडी- मिरज -पुणे मार्गे वळवली (Central Railway Megablock) जाणार आहे.

लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर परिणाम (Central Railway Megablock)

या मेगा ब्लॉक चा परिणाम लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर सुद्धा होणार असून नागरकोयल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ही गाडी 28 जुलै रोजी गुंतकल-बल्लारी-हुबळी-मिरज-पुणे मार्गे रवाना होईल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागरकोयल ही गाडी 29 जुलै रोजी पुणे-मिरज-हुबळी-बल्लारी-गुंतकल मार्गे आणि चेन्नई – एकतानगर एक्स्प्रेस ही गाडी 28 जुलै रोजी गुंतकल- बल्लारी- हुबळी- मिरज-पुणे (Central Railway Megablock) मार्गे धावणार आहे.