Central Railway : श्रावण महिना सुरू झाल्यानंतर लागोपाठ सणांची रेलचेल सुरू होते. भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट आणि त्यानंतर 18 ऑगस्टला रविवार असून 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. त्यामुळे लागून सुट्ट्या आल्यामुळे अनेक जण प्रवासासाठी निघतात. हीच बाब लक्षात घेऊन रेल्वे खात्याकडून जादाच्या गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय सणांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी असते आणि ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय रेल्वेकडून पुरेपूर प्रयत्न केला जात असून विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे कडून घेण्यात आला आहे. या गाड्या नेमक्या कोणत्या आहेत आणि कोणत्या मार्गावरून कधीपर्यंत धावणार आहेत (Central Railway) चला पाहूयात…
रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपूर- मुंबई आणि नागपूर- पुणे या मार्गांवरून विशेष रेल्वे धावणार आहेत. या दोन्ही रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक काय आहे आता पाहूयात
मुंबई- नागपूर विशेष रेल्वे (Central Railway)
या गाडीच्या दोन फेऱ्या धावणार असून विशेष गाडी क्रमांक 0 2 1 3 9 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईतून 15 ऑगस्ट रोजी 25 वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी 15 वाजून 30 मिनिटांनी पोहोचणार आहे. याशिवाय गाडी क्रमांक 02140 नागपूर इथून 16 ऑगस्ट रोजी 13 वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी चार वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल. तर या गाडीमध्ये एक वातानुकुळीत प्रथम तीन वातानुकूलित द्वितीय 15 वातानुकूलित तृतीय आणि दोन जनरेटर व्हॅन (Central Railway) राहतील.
या स्थानकांचा समावेश
या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक ,मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला ,मुर्तीजापुर, बडनेरा, धामणगाव, आणि वर्धा असे थांबे असणार आहेत.
नागपूर- पुणे विशेष गाडी (Central Railway)
नागपूर -पुणे विशेष गाडीच्या चार फेऱ्या होणार असून गाडी क्रमांक 0 2 1 4 4 नागपुरातून 14 आणि 16 ऑगस्ट रोजी 19 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी 11:35 वाजता पोहोचणार आहे. तर विशेष गाडी क्रमांक 02143 पुणे येथून 15 आणि 17 ऑगस्ट रोजी 16 वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सहा वाजून 30 मिनिटांनी पोहोचणार आहे. या गाडीला 14 वातानुकूलित तृतीय आणि दोन जनरेटर व्हॅन अशी रचना राहील. तरी प्रवाशांनी या दोन्ही गाड्यांचा लाभ घ्यावा असा आवाहन रेल्वे खात्याकडून करण्यात आला आहे.
या स्थानकांचा समावेश
या गाडीसाठी वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन आणि उरळी या स्थानावर थांबे घेणार (Central Railway) आहेत.