Central Railways : मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय; ट्रान्स हार्बर लाईनवरील अतिक्रमण हटवणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्य रेल्वे (Central Railways)  नेहमीच आपल्या प्रवाश्यांसाठी आणि त्यांच्या सुखसोयीसाठी अनेक मोठं मोठे निर्णय घेते. तसेच याहीवेळी मध्य रेल्वेने प्रवासाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर धावणाऱ्या लोकलबाबत मोठा निर्णय घेतला आहे. हार्बर मार्गावर धावणाऱ्या लोकल ट्रेनचा वेग वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने निर्णय घेतला आहे. हा वेग वाढवण्यासाठी रेल्वे रुळाच्या लगत असलेले अतिक्रमण हटवण्यात येणार आहेत. या लोकलचा वेग वाढल्यानंतर प्रवाश्यांच्या प्रवासाचा वेळ कमी होणार असून त्यामुळे त्याचा फायदा होणार आहे.

किती असेल वेग? 

मार्गावर धावणाऱ्या लोकलचा वेग हा 80 किमी प्रतितास इतका आहे.  मात्र आता हा वेग वाढवून 105 प्रतितास इतका करण्यात येऊ शकतो. या योजनेवर सध्या काम सुरू आहे. तसेच मार्च 2024 पर्यंत याची अमलबजावणी केली जाणार आहे. असे मुंबई विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

या ठिकाणचे हटवण्यात आले अतिक्रमण- Central Railways 

मध्य रेल्वेकडून गाडीचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेने सोमवारी चुनाभट्टी ते GTB नगर दरम्यानचे अतिक्रमण हटवण्यात आले आहे. येथे एकूण 165 अवैध अतिक्रमण आहेत. यामध्ये 140 लहान दुकानें तर 25 झोपड्या आहेत. तसेच या भागात आरपीएफ आणि अन्य कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच रेल्वे अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून वडाळा, मानखुर्द, चुनाभट्टी आणि जीटीबी नगर येथे देखील अतिक्रमण करण्यात आले आहे. तसेच येथे अवैध बांधकामही करण्यात आले आहे. मात्र येथील अतिक्रमण हटवता येत नाही कारण हे अतिक्रमण हटवण्यासाठी राजकीय नेत्यांना विरोध करावा लागतो. असे त्यांनी सांगितले.

अतिक्रमण हटवल्यानंतर होणार काम सुरु

मध्य रेल्वेने (Central Railways) घेतलेल्या निर्णयाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पट्रीच्या लगत असलेले अतिक्रमण हटवल्यानंतरच हे काम सुरु करण्यात येईल. असे मध्य रेल्वेने सांगितले आहे. अतिक्रमण हटवल्यानंतर रेल्वेकडून इंजिनियरिंग वर्क सुरू करण्यात येणार आहे. तसेच रेल्वेची गिट्टी बदलण्यात येणार आहे. तसेच अनेक ठिकाणचे सिग्नलचे केबल्स बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गाचा वेग वाढणार आहे.