Video छ. उदयनराजेंनी गायलं : “तेरे बिना जिया जाये ना”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
खासदार उदयनराजे भोसले यांचा आज 24 फेब्रुवारी रोजी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या निमीत्ताने सलग 3 दिवस साता-यात वेगवेगळ्या कार्यक्रमांच आयोजन करण्यात आल आहे. वाढदिवासच्या पूर्वसंध्येला गायक रोहीत राऊत लाईव्ह काँन्सर्टचा कार्यक्रम गांधी मैदान येथे ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी सातारकरांच्या फर्माइशीवर गाणं गायलं “तेरे बिना जिया जाये ना” हे गाणं खासदार उदयनराजे भोसले यांनी गायल या वेळी उपस्थितीतांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवुन उदयनराजेंना दाद दिली.

खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असे नियोजन करण्यात आले आहे. वाढदिवासच्या पूर्व संध्येला गांधी मैदानावर इंडियन आयडॉल फेम सिंगर रोहित राऊत व जुईली जोगळेकर यांनी आपली अदाकारी सादर केली. सातारकरांच्या आग्रहामुळे खा. उदयनराजे यांनी गाण गायल्याने, त्यास उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला.

माझ्या चाहत्यांसाठी हे गाणं
यावेळी उदयनराजे म्हणाले, माझ्या चाहत्यांसाठी मी हे गाणं गायलं आहे. तुम्ही माझ्यावर प्रेम करता. त्यांच्यासाठी हे गाणं गायलं आहे असे सांगत उदयनराजेंनी गांधी मैदानावरची सर्वांची मनं जिंकली.