हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचा २० मार्च रोजी अधिकृत घटस्फोट (Chahal-Dhanashree Divorce) झाला. चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाने भारतीय क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली होती.. चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाच खरं कारण काय याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र आता एका रिपोर्ट नुसार, लग्नानंतर राहायचं कुठं? मुंबईत कि हरियाणात? यावरून धनश्री आणि चहल मध्ये मतभेत होते. त्यातूनच दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं म्हंटल जातंय.
धनश्रीला मुंबईत राहायचं होत- Chahal-Dhanashree Divorce
ज्येष्ठ पत्रकार विकी लालवानी यांच्या मते, लग्नानंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हरियाणामध्ये राहू लागले. परंतु, लग्नाच्या काही दिवसांनंतर, धनश्रीने मुंबईत स्थलांतरित होण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र चहलने ते मान्य केले नाही. चहलची इच्छा होती की धनश्रीने त्याच्या आई वडिलांसोबत हरियाणामध्ये राहावे.
विकी लालवानी यांनी पोस्ट शेअर करत म्हंटल कि , “लग्न झाल्यानंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री हरियाणामध्ये चहलच्या पालकांसोबत राहायला गेले आणि गरज पडल्यासच मुंबईत आले. या मुंबई-हरियाणामुळे दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यांचे लग्न तुटले. खरंतर, चहलला त्याच्या पालकांसोबत राहायचं होत आणि धनश्रीला मुंबईत राहायचे होते.”
दरम्यान, बार अँड बेंचच्या अहवालानुसार, युजवेंद्र चहलने धनश्री वर्मा यांना पोटगी म्हणून ४.७५ कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. घटस्फोटापूर्वी (Chahal-Dhanashree Divorce) युजवेंद्र चहलने धनश्रीला २.३७ कोटी रुपये दिल्याचे बोलले जात आहे. तर घटस्फोट झाल्यानंतर २.३८ कोटी रुपये देण्यात आले.