नाशिकमध्ये महिलेच्या गळ्यातील साखळी ओढून चोरटे पसार, VIDEO आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये सोनसाखळी चोरटयांनी (chain snatching) थैमान घातले आहे. नाशिक शहरातील पवन नगर परिसरात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये चोरटे महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून (chain snatching) पसार झाले आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
पवन नगर परिसरात एक महिला रस्त्याने जात होती. इतक्यात अचानक समोरून एका दुचाकीवर दोघे जण तिथे आल्याचं पाहायला मिळतं. मात्र, हे दोघं फक्त रस्त्यावरुन आपल्या दुचाकीवर जात आहेत, असं महिलेला वाटलं. महिला समोर चालतच राहिली. इतक्यात दुचाकीस्वाराने गाडी महिलेच्या अगदी जवळ नेली. महिलेला काही कळण्याच्या आधीच मागे बसलेल्या तरुणाने महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढली (chain snatching) आणि ते दोघे घटनास्थळावरून पसार झाले.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, महिला एकटीच रस्त्याने जात आहे. इतक्यात अचानक एका वळणावरुन दोघेजण बाईकवरून महिलेच्या जवळ येतात. यानंतर दुचाकीवर मागे बसलेला व्यक्ती महिलेच्या गळ्यात सोनसाखळी लांबवतो(chain snatching). हे सगळे एवढ्या फास्ट घडते कि महिलेला याची कल्पना येईपर्यंत ते चोर घटनास्थळावरून पसार झाले होते. ही संपूर्ण घटना त्या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!