Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीत दुर्गामातेच्या पूजेवेळी चुकूनही वापरू नका ‘या’ वस्तू; अन्यथा होईल मोठं नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरी केला जातो. नवरात्री ही वर्षातून 4 वेळा येत असते. या चार नवरात्रीमध्ये एक शारदीय, एक चैत्र, दोन गुप्त नवरात्री असतात. यावर्षी चैत्र नवरात्री 9 एप्रिल 2024 पासून (Chaitra Navratri 2024) सुरू होत असून ती 17 एप्रिल रोजी संपणार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. ही नऊ रूपे म्हणजे माँ शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, माँ महागौरी आणि माँ सिद्धिदात्री. दुर्गादेवीची मनापसून पूजा केल्यानंतर ती आपल्या भक्तांना आशीर्वाद देते आणि भक्तांच्या सर्व इच्छा- मनोकामना पूर्ण करते असं म्हंटल जाते. मात्र शास्त्रांमध्ये काही गोष्टींचा उल्लेख आहे ज्यांचा वापर नवरात्रीच्या पूजेदरम्यान अजिबात करू नये. या गोष्टींच्या वापरामुळे दुर्गामाता तुमच्यावर नाराज होईल आणि तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. चाल तर आज आपण जाणून घेऊयात देवीच्या पूजेमध्ये कोणत्या गोष्टीचा वापर करू नये.

ही फुले अर्पण करू नका – Chaitra Navratri 2024

खरं तर दुर्गामातेला लाल रंगाची फुले खूप आवडतात. नवरात्रीचाय काळात दुर्गामातेला लाल फुले अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. परंतु जर तुमच्याकडे लाल फुले नसतील तर तुम्ही कमळ, हिबिस्कस, गुलाब आणि झेंडूची फुलेही अर्पण करू शकता, परंतु कणेर, धतुरा आणि मदारची फुले चुकूनही अर्पण करू नका.

फुटका नारळ

नवरात्रीमध्ये कलशाच्या स्थापनेला अधिक महत्त्व असते. आपण नेहमीप्रमाणे कलश स्थापनेसाठी नारळाचा वापर करतो. पण याठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा कि, दुर्गामातेच्या पूजेवेळी कलश स्थापनेसाठी तुम्ही जो नारळ वापरणार आहात तो फुटलेला नसावा. फुटलेला नारळ अशुभ मानला जातो. त्यामुळे चांगला नारळ वापरावा.

तुकडे झालेला तांदूळ वापरू नका

आपण पूजेसाठी तांदूळ म्हणजेच अक्षता वापरतो.. मात्र दुर्गामातेच्या पूजेवेळी अक्षता चांगल्या बघून वापरा, तुकडे झालेल्या अक्षताचा वापर दुर्गामातेच्या पूजेवेळी वापरू नका. कारण तुटलेला तांदूळ वापरणे अशुभ मानले जाते.