यंदा चैत्र नवरात्री कधी सुरु होणार? महत्त्व आणि घटस्थापनेची वेळ जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरी केला जातो. नवरात्री ही वर्षातून 4 वेळा येत असते. या चार नवरात्रीमध्ये एक शारदीय, एक चैत्र, दोन गुप्त नवरात्री असतात. यात चैत्र महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. चैत्र नवरात्र चैत्र महिन्याच्या शुल्क पक्षात येत असते. याच नवरात्रीला वसंत नवरात्री असे देखील म्हणतात. हिंदू धर्मामध्ये ही नवरात्री तब्बल 9 दिवस भक्ती भावाने साजरी करतात. यंदा चैत्र नवरात्री (Chaitra Navratri) ही 9 एप्रिल 2024 ते 17 एप्रिल 2024 या कालावधीत साजरी केली जाईल. त्यापूर्वी चैत्र नवरात्रीचा शुभ मुहूर्त, तिचे महत्त्व आणि घटस्थापनेची वेळ जाणून घ्या.

चैत्र नवरात्री मुहूर्त

यावर्षी चैत्र नवरात्री उत्सव 9 एप्रिल 2024 रोजी सुरू होईल तर 17 एप्रिल 2024 रोजी संपेल. याकालावधीत 9 एप्रिल 2024 रोजी सकाळी 06:26 ते 10:35 पर्यंत चैत्र घटस्थापनेची वेळ असेल. लक्षात ठेवा की, घटस्थापना करताना सर्वात अगोदर लवकर उठून अंघोळ करावी. त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून पूजेची तयारी करावी. पुढे घटस्थापना करून दुर्गा देवीची पूजा करावी. देवीला गोड नैवेद्य दाखवावा. नवरात्रीत दुर्गा देवीची मनोभावे पूजा केल्यास घरात सुख-समृद्धी टिकून राहते.

चैत्र नवरात्रीचे महत्व

नवीन वर्षाच्या कॅलेंडरची गणना चैत्र नवरात्रीपासून करण्यात येते. चैत्र नवरात्रीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. कारण की , चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आदिशक्तीचे रूप प्रकट झाले होते. पुढे देवीच्या विनंतीवरून, ब्रह्मदेवांनी सृष्टीच्या कार्याला सुरुवात केली. म्हणूनच हिंदू नववर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होते.

नवरात्री उत्सव

चैत्र महिन्यामध्ये म्हणजेच नवरात्रीच्या काळात माता दुर्गेच्या नऊ अवतारांची पूजा केली जाते. शैलपुत्री हा माता दुर्गेचा पहिला अवतार आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी शैलपुत्री हिची पूजा करण्यात येते. यानंतर, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी देवी कुष्मांडा, पाचव्या दिवशी देवी स्कंदमाता, सहाव्या दिवशी देवी कात्यायनी, सातव्या दिवशी देवी कालरात्री, आठव्या दिवशी देवी महागौरी आणि नवव्या देवी सिद्धिदात्री या आठ अवतारांची पूजा केली जाते.