Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्री दरम्यान ‘या’ 4 राशींच्या लोकांनी सावध राहावं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । उद्या म्हणजेच 9 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला (Chaitra Navratri 2024) सुरुवात होणार आहे. हिंदू धर्मामध्ये ही नवरात्री तब्बल 9 दिवस भक्ती भावाने साजरी करतात आणि सलग नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. ही नऊ रूपे म्हणजे माता शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, माता महागौरी आणि माता सिद्धिदात्री.. चैत्र नवरात्रीच्या काळात देवीची भक्तिभावाने पूजा- अर्चा केल्यानंतर देवीमाता नक्की प्रसन्न होते आणि आपल्या भक्ताला चांगलं फळ देते असं म्हंटल जाते. मात्र याच चैत्र नवरात्री दरम्यान 4 राशींच्या लोकांना सावध राहावं लागणार आहे.. चला जाणून घेऊया कोणत्या 4 राशी आहेत ज्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.

वृषभ –

यामध्ये नंबर एकला येते ती म्हणजे वृषभ रास … वृषभ राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावे. कोणत्याही फालतू ठिकाणी आपले पैसे खर्च करू नये.. तुम्ही जर शेअर मार्केट आणि ऑनलाईन गेम खेळत असाल तर त्यावर कंट्रोल करा अन्यथा मोठा आर्थिक फटका तुम्हाला बसू शकतो. तसेच समाजामध्ये वावरत असताना लोकांशी प्रेमाने बोला, तुमची वाणी स्वच्छ ठेवा आणि कोणाशीही भांडण तंटा करू नका.

मकर- Chaitra Navratri 2024

यानंतर दुसरी रास म्हणजे मकर रास …. नवरात्रीच्या काळात तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात निष्काळजीपणा करू नका.. अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो .. तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर तुमच्या पार्टनरच्या चुकीमुळेही तुम्हालाच फटका बसेल आणि तुम्ही डिप्रेशनमध्येही राहू शकता. त्यामुळे सावधगिरी बाळगा.

कन्यारास –

कन्या राशींच्या लोकांनी सुद्धा चैत्र नवरात्रीच्या काळात (Chaitra Navratri 2024) खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. तुम्हालाही आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठेही गुंतवणूक करत असताना विचारपूर्वक करा किंवा काही दिवस थांबला तरी चालेल. यशिवाय माझंच खरं या विचारात राहू नका. तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला या काळात अडचणीत आणू शकतो.

तूळ

तूळ राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी खर्चावर नियंत्रण ठेवावे. नोकरीत लक्ष्य आणि व्यवसायात खूप विचार करा. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा नाहीत चांगले संबंध बिघडू शकतात. कुठे प्रवास करायची इच्छा असेल तर तुमचा अतिरिक्त खर्च होईल.