Champions Trophy 2025 : टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव? BCCI चा निर्णय काय?

0
2
Champions Trophy 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Champions Trophy 2025 – चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पाकिस्तानला यजमानपद मिळाल्यानंतर, त्यांना स्पर्धेच्या आयोजनाशी संबंधित अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यानंतर सर्व भारतीय सामने दुबईत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच भारतीय खेळाडू जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहिण्यास तयार नाही. त्यामुळे जर्सीवर पाकिस्तानचे नाव घालण्याच्या विषयावर सध्या वाद निर्माण झाला आहे. जर BCCI ने पाकिस्तानचे नाव जर्सीवर लिहिण्यास नकार दिला, तर ते आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन होईल. त्यामुळे आता BCCI चा निर्णय काय असेल याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

जर्सीवर पाकिस्तानचे नाव घालण्यास नकार –

स्पर्धेतील सर्व संघांच्या जर्सीवर यजमान देशाचे नाव असणार आहे. सुरुवातीला, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने जर्सीवर पाकिस्तानचे नाव घालण्यास नकार दिला होता. भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध 2008 च्या मुंबई हल्ल्यानंतर ताणले गेले आहेत आणि 2012-13 पासून या दोन देशांमध्ये द्विपक्षीय मालिका थांबली आहे. चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy 2025) पाकिस्तानात होणार असला तरी, भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला असून, भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवले जातील.

आयसीसीचे जर्सी नियम (Champions Trophy 2025) –

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)च्या नियमांनुसार, स्पर्धेतील प्रत्येक संघाने यजमान देशाचे नाव असलेली जर्सी परिधान करावी लागते. उदाहरणार्थ, 2021 च्या ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या जर्सीवर भारताचे नाव होते, जरी ती स्पर्धा युएईत पार पडली होती. तसेच, पाकिस्तानने देखील 2016 आणि 2023 मध्ये भारताच्या नामांकित जर्सी परिधान केल्या होत्या. आयसीसीच्या या नियमामुळे भारताने पाकिस्तानचे नाव असलेली जर्सी परिधान करण्याचे ठरवले आहे.

बीसीसीआयचे स्पष्टीकरण –

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले की, भारतीय क्रिकेट संघ आयसीसीच्या नियमांचे पालन करेल. “चॅम्पियन्स करंडकादरम्यान (Champions Trophy 2025) जर्सी संबंधित नियमांबाबत आम्ही आयसीसीच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेतला आहे,” असे ते म्हणाले.

रोहित शर्मा पाकिस्तानात जाणार का? –

स्पर्धेपूर्वी सर्व संघांचे कर्णधार एकत्रित पत्रकार परिषदेत सहभागी होतात. यावेळी त्यांच्या छायाचित्रांचे आयोजन केले जाते. पाकिस्तानात होणाऱ्या या कार्यक्रमात भारतीय कर्णधार रोहित शर्मा सहभागी होतील का, याबाबत शंका आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) या कार्यक्रमात रोहितच्या सहभागासाठी प्रयत्नशील आहे, पण भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी मिळवणे भारत सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे. चॅम्पियन्स करंडकाची सुरुवात होण्यास काहीच दिवस बाकी असताना, जर्सी आणि कर्णधारांच्या सहभागाबद्दलची वादाचे कारण बनून राहिली आहे.

हे पण वाचा : बँकिंग ते आरोग्य; AI चे हे कोर्सेस करून कमवा लाखात पगार

16 लाख नोकऱ्या, 54 सामंजस्य करार…; दावोसमधून महाराष्ट्राला खुशखबर