Champions Trophy 2025 : चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर; कोणाकोणाला संधी मिळाली?

0
3
Champions Trophy 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Champions Trophy 2025 – भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी रोहित शर्मा यांच्या नेतृत्त्वाखालील 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आहे. या संघात उपकर्णधार म्हणून युवा खेळाडू शुबमन गिलची निवड करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत देखील हा संघ सहभागी होणार आहे. पण यामध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. तर चला ते कोणते बदल आहेत हे सविस्तरपणे जाणून घेऊयात.

संघात काही महत्त्वाचे बदल –

या संघात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सहभागी होणार नाहीत, त्याच्या जागी हर्षित राणा संघात स्थानापन्न झाले आहेत. तसेच, मोहम्मद शमी दुखापतीमुळे 2024 च्या विश्वचषकानंतर संघाबाहेर गेले होते, परंतु या स्पर्धेसाठी त्याचे पुनरागमन झाले आहे. याशिवाय, यशस्वी जैस्वालला पहिल्यांदाच वनडे संघात स्थान मिळालं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिला सामना –

चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) पाकिस्तान आणि दुबईमध्ये हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना 19 फेब्रुवारीला यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराची येथे होणार आहे. तर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध 20 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिला सामना रंगणार आहे.

भारताचा 15 सदस्यीय संघ (Champions Trophy 2025) –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, यशस्वी जैस्वाल, अर्शदीप सिंग, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा हे 15 सदस्यीय संघ आहेत .

2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक –

भारताची चॅम्पियन्स ट्रॉफीमधील (Champions Trophy 2025) मोहीम 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने सुरू होईल. त्यानंतर भारताचे सामने पाकिस्तान यांच्यात 23 फेब्रुवारीला होणार आहे. तसेच टीम इंडिया 2 मार्चला न्यूझीलंडशी भिडणार आहे. आणि त्यानंतर पुढील फेरीसाठी पात्र ठरल्यास उपांत्य सामना 4 मार्च रोजी होईल. अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबईमध्ये होणार आहे .

भारताचे सामने –

20 फेब्रुवारीला भारत विरुद्ध बांगलादेश, दुबई
23 फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
2 मार्चला भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
4 मार्चला उपांत्य फेरी (पात्र ठरल्यास), दुबई
9 मार्चला अंतिम (पात्र असल्यास), दुबई

2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचे स्वरुप –

या स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार असून ते 2 गटात विभागले जातील. भारत आणि पाकिस्तान गट-अ मध्ये असून, त्यांच्यासोबत न्यूझीलंड आणि बांगलादेश हे संघ असतील. गट-ब मध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड हे संघ आहेत. प्रत्येक संघ गटातील 3 सामने खेळेल, आणि गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. स्पर्धेतील सर्व 8 संघ आपापल्या गटात 3-3 सामने खेळतील. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होईल. अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई येथे खेळला जाईल. भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मोहिमेसाठी सगळे क्रिकेट प्रेमी उत्सुक आहेत, आणि त्याची सुरुवात 20 फेब्रुवारीपासून बांगलादेशविरुद्ध होईल.

हे पण वाचा : UPSC देत आहात ? मग या 5 परीक्षांची ही तयारी करू शकता!

लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार? अदिती तटकरेंनी दिली मोठी अपडेट