Chanakya Niti : पती- पत्नीने रोज ‘हे’ काम केल्यास नात्यात कधीच अंतर येणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आचार्य चाणक्यांच्या नीतीचे (Chanakya Niti) पालन करून अनेकांनी जगावर राज्य केले आहे. त्यांनी मानवाला कार्यक्षम जीवन जगण्यासाठी अनेक तत्त्वे दिली आहेत. चाणक्यांनी वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी मिळण्यासाठी सुद्धा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नितीमध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या नातेसंबंधांबाबतही अनेक तत्वे सांगितली आहेत, त्यांनी अशा काही कामे सांगितली आहेत जी केल्याने पती- पत्नीच्या नात्यात कधीच अंतर येणार नाही. चला याबाबत जाणून घेऊया… .

1) पती-पत्नीने एकमेकांचा आदर करावा-

वैवाहिक जीवन चांगले होण्यासाठी नवरा बायकोने एकमेकांचा आदर करावा. हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. चाणक्य नीतीनुसार, जर प्रेमामध्ये आदर असेल तर नाते अधिक सुंदर होते. त्यामुळे पती- पत्नीने एकमेकांचा आदर करून एकमेकांचा सन्मान वाढवावा.

2) खाजगी गोष्टी कोणाशीही शेअर करू नये-

आचार्य चाणक्य यांनी सांगितल्या प्रमाणे, पती-पत्नीने आपल्या खाजगी गोष्टी कोणालाही सांगू नयेत. खाजगी गोष्टी कोणासोबत शेअर केल्यामुळे नात्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. कारण नवरा- बायको मध्ये घडणाऱ्या गोष्टी शेअर केल्याने एकमेकांचा विश्वास तुटतो हे दोघांनीही लक्षात ठेवावे.

Chanakya Niti : ज्या पुरुषामध्ये कुत्र्याचे ‘हे’ 4 गुण असतात, त्याची पत्नी…

3) कधीही अहंकार दाखवू नका

नवरा- बायको म्हणजे एकाच गाडीच्या 2 चाकासारखे असतात. जेव्हा ते एकत्रितपणे चालून संसाराचा गाडा हाकत तेव्हाच त्यांचा संसार चांगला होईल. त्यामुळे दोघानीही अहंकार बाळगू नये. तसेच कोणत्याही गोष्टीचा अभिमान मनात ठेऊ नये. आपण जर उद्धटपणा दाखवला तर नातं बिघडतं असं आचार्य चाणक्य सांगतात.

4) नेहमी संयम राखा –

चाणक्य नीतीनुसार, नवरा – बायकोने कोणत्याही परिस्थितीत संयम बाळगावा. जे कोणत्याही परिस्थितीत संयम राखतात ते सर्वात वाईट परिस्थितीला तोंड देऊ शकतात आणि कोणत्याही अडचणीतून बाहेर पडू शकतात. त्यामुळे पती पत्नीने आपलं नातं टिकवण्यासाठी संयम राखणं गरजेचं आहे.