Chanakya Niti : … तर अशा लोकांनी घराऐवजी जंगलात राहावे; चाणक्यांनी असं का सांगितलं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आचार्य चाणक्य हे एक उत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञ, कुशल राजकारणी आणि तत्वज्ञानी होते. आचार्य चाणक्य यांनी माणसाला कार्यक्षम जीवन जगण्यासाठी अनेक तत्वे दिली आहेत. त्यांनी आपल्या नीतीत नातेसंबंधी, त्यातील महत्त्व याबाबत सुद्धा मार्गदर्शन केलं आहे. मनुष्याच्या जीवनात त्याची आई आणि पत्नी यांच्यासोबतच्या नात्यावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे. अनेकदा पुरुष लग्नाआधी त्यांच्या आईच्या खूप जवळ असतात. लहानपणापासून प्रत्येक लहान- सहान गोष्ट तो आईसोबत शेअर करत असतो परंतु एकदा लग्न झालं कि त्याच्या आयुष्यात बदल होतो. चाणक्य म्हणतात हो आपली आई आणि पत्नी दोघींचाही आदर आणि प्रेम टिकवून ठेवतो तो आनंदी जीवन जगतो. त्याचवेळी चाणक्याने एका श्लोकात सांगितले आहे की, पुरुषांनी घर सोडून जंगलात जावे. चला जाणून घेऊया चाणक्य असं का म्हणाले…

चाणक्यनीती मध्ये आचार्य चाणक्यांनी स्त्रिया घरात असण्याचे महत्त्व सांगितले आहे. चाणक्य म्हणतात की, घरात स्त्री असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण बालपणापासून ते तरुण होईपर्यंत आई व्यक्तीला मार्गदर्शन करते. त्याला योग्य मार्गावर चालायला शिकवले असते. ममताची सावली घराला घर बनवते. आईशिवाय घराला किंमत नाही. चाणक्य म्हणतात की अशा घरात राहण्यापेक्षा जंगलात जाणे चांगले परवडेल जिथे निसर्ग मातेच्या कुशीत निवांतपणा अनुभवता येईल.

चाणक्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात पत्नीची भूमिका आणि तिचे महत्त्व सुद्धा सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात जर घरात आई नसेल तर शांत आणि कोमल स्वभावाची पत्नीही घरात सुख-शांती आणू शकते. पण जर पत्नी प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करत असेल, आणि तिच्यामध्ये कुटुंब एकत्र ठेवण्याची भावना नसेल तर अशा घरात राहण्यापेक्षा जंगलात जा. चाणक्यांना हेच सांगायचं आहे की, माणसाला जिथे मानसिक शांती आणि आनंद मिळेल तिथे राहायला हवे. चाणक्याने म्हटले आहे की, घर तोपर्यंतच राहण्यायोग्य आहे, जोपर्यंत घरात शांतता आणि सौहार्द असेल. घरात एकत्र राहून प्राण्यांसारखे भांडत राहिलो तर जंगलात राहण्यात काय वाईट आहे.