Saturday, March 25, 2023

Chanakya Niti : सापापेक्षाही जास्त धोकादायक असतात ‘ही’ माणसे; तुम्हीही सावध रहा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी माणसाला कार्यक्षम जीवन जगण्यासाठी अनेक तत्वे दिली आहेत. चाणक्य नीतीचे पालन करून अनेकांनी जगावर राज्य केलं. मनुष्याचे जीवन अधिक सुखकर होण्यासाठी चाणक्यानी अनेक तत्वे सांगितली आहेत. चाणक्यनीतीचे पालन करून तुम्ही आयुष्यात भरपूर यशस्वी होऊ शकता. माणसाने त्याच्या आयुष्यात कोणत्या 3 लोकांपासून नेहमी दूर राहायला हवे याबाबत सुद्धा आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया….

1) स्वार्थी लोकांपासून दूर रहा

माणसाने आपल्या संपूर्ण जीवनात स्वार्थी लोकांपासून दूर राहावे असं चाणक्यांनी सांगितलं आहे. स्वार्थी लोकांना नेहमीच स्वार्थच दिसतो. ते स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचा विचार न करता उलट तुम्हालाच अडचणीत आणू शकतात. त्यामुळे अशा लोकांपासून लांब राहणे कधीही चांगलं.

- Advertisement -

2) लोभी लोकांपासून दूर रहा

लोभ हा सर्वात वाईट असतो. लोभी माणूस आपल्या लोभासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. स्वतःच्या स्वार्थापायी हे लोक कधीच कोणाचे भले करू शकत नाहीत. त्यामुळे चाणक्याच्या मते मनुष्याने नेहमी लोभी आणि मत्सरी व्यक्तीपासून अंतर राखले पाहिजे. असे लोक फक्त स्वतःचा विचार करतात.

3) रागावर नियंत्रण न ठेवणारी व्यक्ती

राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो असं म्हंटल जात. चाणक्याच्या मते, ज्या व्यक्तीला छोट्या छोट्या गोष्टीवरून लगेच राग येतो आणि जो माणूस आपल्या रागावर नियंत्रण मिळवू शकत नाही अशा व्यक्तीपासून नेहमी लांब रहावं. स्वतःच्या रागामुळे असे लोक तुम्हाला अडचणीत आणू शकतात.