चंदीगडमधील शाळकरी मुलांचा खासगी डेटा विक्रीला; ४ ते ६रु.प्रति विद्यार्थी दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र। वर्तमान आधुनिक युगात ‘डेटा इज न्यू ऑइल’ असं म्हटलं जात. त्यामुळं आपली खासगी माहिती कुठेही शेयर करताना सजग नागरिक नेहमीच काळजी घेत असतात. मात्र, तांत्रिक युगात आपला खासगी डेटा काहीजण त्यांच्या फायद्यासाठी चोरल्या गेल्याच्या बातम्या आपल्याला ऐकायला येतात. चंढीगडमध्ये असाच एक खासगी डेटा चोरीचा प्रकार एका नामवंत वृत्तपत्राने उजेडात आणला आहे.

चंदिगडच्या सेक्टर ३४ला कोचिंग सेंटरची पंढरी म्हटलं जात. याच भागातील काही कोचिंग सेंटरमध्ये नोकरी करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी एका वृत्तपत्राच्या वार्ताहराला आपल्याकडे चंदीगडमधील विविध शाळांकडून गोळा केलेल्या विद्यार्थ्यांच्या खासगी डेटाचा ऍक्सेस असल्याचे सांगितले. या डेटामध्ये त्यांची नावे, वर्ग, रोल नंबर, शाळेचे नाव आणि विद्यार्थ्यांची वयक्तिक माहिती यांचा समावेश आहे. हा डेटा ४ ते ६ रुपयांना विविध मार्केटिंग एजन्सी यांना विकत असल्याचे त्यांनी सांगितले. काही वेळेस हा आकडा जवळपास २८ हजार पर्यंत जातो. आपल्याकडे चंदीगडमधील २६ शाळांच्या विद्यार्थ्यांचा डेटा असल्याचं या कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

गोळा केलेल्या या डेटात केवळ विद्यार्थ्यांची माहिती नाही तर त्याच्या पालकांची माहिती सुद्धा आहे. यामध्ये त्यांचा फोन नंबर, पगाराचा तपशील, पत्ता, अगदी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलची माहिती आहे. काही लोक या डेटाचा वापर गैरप्रकार घडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे या वृत्तपत्राच्या तपासात समोर आलं आहे.