रेल्वेचा अपघात कि घातपात?? लोको पायलटच्या दाव्याने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेश मध्ये काल चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेस ट्रेनचा (Train Accident) अपघात झाला. या एक्स्प्रेस ट्रेनचे काही डबे रुळावरून घसरले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून काही लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा आणि जिलाही दरम्यान पिकौरा येथे ही घटना घडली. मात्र हा चुकून अपघात झाला कि यामागे कोणता घातपात आहे याबाबत शंका निर्माण झाली आहे. कारण अपघात होण्यापूर्वी एक कसला तरी मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू असल्याचा दावा ट्रेनच्या लोको पायलटने केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनचा लोको पायलट त्रिभुवन यांनी दावा केला आहे की, अपघात होण्यापूर्वी मोठा आवाज आला. त्याच्या मते, जेव्हा ट्रेन गोंडा-झिलाही रेल्वे सेक्शनच्या पिकौरा गावाजवळून जात होती, तेव्हा त्याला मोठा आवाज ऐकू आला, त्याचवेळी त्याला धोक्याची जाणीव झाली. त्याने इमर्जन्सी ब्रेक लावले गेले, त्यानंतर डबे रुळावरून घसरले.. रेल्वेने या अपघाताच्या तपासात घातपात असण्याची शक्यता वर्तवली आहे. या ट्रेन अपघातात 13 डबे रुळावरून घसरले आणि तीन एसी डबे उलटले. रेल्वेने या घटनेच्या CRS तपासाचे आदेश दिले आहेत. या अपघातातील सर्व जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, या रेल्वे अपघातानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. आरडाओरडा सुरु झाला. काही जणांनी भीतीने खाली उडी मारली, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून त्याची ओळखही पटू शकली नाही. तर तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर प्रवासी आपापल्या सामानाची काळजी घेत होते तर काहीजण आपल्या नातेवाईकांना मोबाईलवर मेसेज करत आपबिती सांगत होते.