औरंगाबाद प्रतिनिधी | आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस आहे. त्या अनुषंगाने औरंगाबादेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आयोजित केलेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमाला औरंगाबादचे एमआयएम चे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे अनुपस्थित होते.
यावर शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या अनुपस्थितीवर आपली तिखट प्रतिक्रिया नोंदवली. खैरेंना खा.इम्तियाज जलील यांच्या अनुपस्थिती विचारले असता त्यांनी जलील यांचे नाव न घेता ‘ते रझाकाराची औलाद’ आहे अशी जळजळीत टीका केली. या बोथट टीके नंतर आता खासदार जलील हे यावर काय उत्तर देतील हे पाहणे आता औत्सुक्याचे राहणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता.