भाजपच ठरलं ! आगामी निवडणुकीत शिंदे गटाच्या मदतीनं 200 पेक्षा जागा आणणार; भाजप प्रदेशाध्यक्षांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक येथे भाजपची महत्वाची प्रदेश कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील पदाधिकारी आणि मंत्र्यांना महत्वाच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गट मिळून मिशन 200 पेक्षा जास्त जागांचे लक्ष ठेवले असल्याची घोषणा बावनकुळे यांनी केली. तसेच कार्यकर्त्यांनी आता तयारीला लागावे, त्यांनी राजकारणावर जास्त बोलू नये. तसेच प्रवक्त्यांनीदेखील वायफळ बोलू नये, अशी ताकीद बावनकुळे यांनी दिली.

भाजपच्या नाशिकमध्ये पार पडलेल्या कार्यकारिणी बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीवेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, मंत्र्यानी फक्त स्वतःच्या विभागाशी संबंधित विषयांवरच बोलावे. त्यांनी राजकीय विषयांवर भाष्य करू नये. देवेंद्र फडणवीस हेच फक्त राजकीय विषयांवर बोलतील. तसेच आमदार श्रीकांत भारतीय निवडणूक इन्चार्ज म्हणून काम पाहणार आहेत.

दरम्यान आता आगामी निवडणुकीसाठी ‘महाविजय 2024’ म्हणून संकल्प केला असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे नाशिकच्या कार्यकारिणी बैठकीत भाजपकडून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली असून कार्यकर्त्यांना तयारीला लागावे असे आदेशही देण्यात आले आहेत.

‘महाविजय 2024’ चा महासंकल्प

नाशिक येथे पार पडलेल्या बैठकीत यावेळी पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार असून भाजपकडून आज मिशन 2024 ची घोषणा करण्यात आली. राज्यातून 48 खासदार निवडून जातात सध्या भाजपकडे 23 खासदार आहेत. भाजपला केंद्रात पुन्हा 47 यायचे असल्यास महाराष्ट्रातून किमान 40 जागांचे बळ भाजपला हवे आहे त्यामुळे केंद्रातून सत्तेचे स्वप्न पाहायचे असेल तर त्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदारांनी खासदारांची कुमक भाजपला हवी आहे त्यामुळे या बैठकीत मिशन 45 अशी घोषणा करण्यात आली आहे तर दुसरीकडे राज्यसभा निवडणुका देखील आगामी काळात होणार असल्याने या निवडणुकांसाठी भाजपकडून मिशन 200 चा नारा देण्यात आला आहे.

फडणवीसांनीही केले मार्गदर्शन

नाशिक येथे आज पार पडलेल्या भाजपच्या महत्वाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना त्यांनी मूलमंत्रही दिला. आम्ही 2024 साठी 20-20 ची बॅटिंग सुरू केली आहे. आगामी निवडणुका शिंदे आणि आम्ही एकत्रित लढू आणि जिंकू देखील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. तर महाविकास आघाडी सरकारवर अनेक मुद्यांवरून निशाणा साधला.