व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार कोण? बावनकुळेंनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार कोण असणार याच्या चर्चा सातत्याने रंगत आहेत. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपमध्ये अनेकजण इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्ष नेमका कोणाला संधी देणार याबाबत थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाच विचारले असता, या विषयावर आत्ताच चर्चा नको असं म्हणत त्यांनीनी पत्ते खुले केले नाहीत.

चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांना पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण असेल असं विचारलं असता सध्या तरी ही चर्चा नको, गिरीश बापट यांचे कुटुंबीय अद्याप दुःखातुन सावरलेलं नाही. तुम्ही काहीही चर्चा करू नका. मी ही अशी कोणती चर्चा करणार नाही असं म्हणत त्यांनी अधिक बोलणं टाळलं. बावनकुळे यांच्या या उत्तराने भाजपकडून पुण्यासाठी उमेदवार कोण असेल हे मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे.

दरम्यान, पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे यांची नावे चर्चेत आहेत तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांचं नाव आघाडीवर आहे. धंगेकर यांना उमेदवारी दिल्यास पुण्यातील राजकीय आखाडा आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे. धंगेकर यांनाच लोकसभेसाठी उमेदवारी दिल्यास भाजपसाठी विजय सोपा नसेल असेही म्हंटल जात आहे.