Monday, January 30, 2023

कराड शहरात दिवाळीत पाणी पुरवठा वेळेत बदल

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहरात दिवाळी सणानिमित्त तीन दिवस पाणी पुरवठा वेळेत बदल करण्यात येणार आहे. सोमवार दि. 24 ते बुधवार दि. 26 पर्यंत सकाळच्या पाणी पुरवठा वेळेत बदल केला असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली आहे.

कराड शहरात सोमवारपासून पाणी टाकी व पाणी वेळ पुढील प्रमाणे ः- सोमवार पेठ पाण्याची टाकी सकाळी – 5.30 ते 6.30, सुर्यवंशी मळा पाण्याची टाकी (नेहमी प्रमाणे), रूक्मिणी नगर पाण्याची टाकी – सकाळी 6 ते 7, गजानन हाैसिंग सोसायटी पाण्याची टाकी (सकाळी नेहमी प्रमाणे), रविवार पेठ पाण्याची टाकी – सकाळी 6 ते 7, टाऊन हाॅल पाण्याची टाकी – सकाळी 6 ते 7, मार्केट यार्ड पाण्याची टाकी – (नेहमी प्रमाणे) असा बदल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरात मंगळवार दि. 25 रोजी सायंकाळचा पाणी पुरवठा नेहमी प्रमाणे सुरू ठेवण्यात येईल. गुरूवारी दि. 27 पासून पाणी पुरवाठा नेहमी प्रमाणे करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.