नाशिकवरून झेपवणाऱ्या विमानाच्या वेळेत बदल; पहा काय आहे नवं वेळापत्रक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्यापैकी अनेकजण विमानाने प्रवास करत असतात. ज्यांना विमानाने प्रवास परवडतो अशी मंडळी वेळ वाचवण्यासाठी जलद सेवा असलेलया विमानाच्या प्रवासाला प्राधान्य देतात. परंतु तुम्ही जर नाशिककर असाल आणि विमानाने तुम्हाला सतत प्रवास करावा लागत असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. याचे कारण म्हणजे नाशिकवरून झेपवणाऱ्या विमानाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. इंडिगो कंपनीने हिवाळी सत्राचे वेळापत्रक जाहीर केले त्यामध्ये नाशिक विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

कसा असेल हा बदल?

गोवा-नाशिक ह्या फ्लाईटची आधीची वेळ ही दुपारी 2:55 ते 4:50 अशी होती. मात्र आता नवीन वेळापत्रकानुसार ती दुपारी 1:55 ते 3:45 अशी देण्यात आली आहे.  त्याप्रमाणे नाशिक-गोवा दुपारी 1 ते 2:35 अशी होती दुपारी 11:45 ते 1:25 झाली आहे. नाशिक-नागपूर सकाळी 8:10 ते 9:50 रात्री 7:30 ते 9:10,  नाशिक-अहमदाबाद रात्री 9:25  ते 10:50 दुपारी 4:5  ते 5:25, नाशिक-अहमदाबाद दुपारी 11:5 ते 11:30 सायं. 9:45 ते 11:5, अहमदाबाद-नाशिक रात्री 7:40 ते 9:5 सायं. 5:56 ते 7:10, अहमदाबाद-नाशिक सकाळी 9:15 ते 10:35 सकाळी 8 ते 9:25, इंदूर-नाशिक सकाळी 6:45  ते 7:50 दुपारी 1:15  ते 2:25, नागपूर-नाशिक रात्री 7:00 ते 8:45 सकाळी 9:40 ते 11:25, हैदराबाद-नाशिक सकाळी 10:50  ते 12:35 सकाळी 10:30 ते 12:30, नाशिक-इंदूर रात्री 9:50 ते 10:15  दुपारी 12:50  ते 2:10, नाशिक-हैदराबाद सायंकाळी 5:25  ते 7:15 दुपारी 2:45  ते 4:25. अश्याप्रकारे ह्या वेळेते बदल करण्यात आला असून आता तुम्हालाही तुमच्या कामाची वेळ बदलावी लागणार आहे.

का बदलले वेळापत्रक?

सध्या नाशिक ओझरच्या विमानतळवून केवळ इंडिगोच्या फ्लाईट सुरु आहेत. ह्यातील नियोजित पाच शहरांना ही सेवा देण्यात आली आहे. नाशिकवरून नागपूर, गोवा, इंदूर व हैदराबाद या पाच शहरांसाठी सेवा दिली जात आहे. मात्र नाशिकसाठी अजून काही शहरे जोडण्याची गरज असल्याकारणाने त्यानुसार काही उद्योजकांचे प्रयत्न सुरु आहेत.

29 ऑक्टोबरपासून सुरु होणारी सेवा ढकलली पुढे

नवी दिल्ली- नाशिक -बेंगळुरू अशी नियोजित सेवा सुरु करण्याची घोषणा इंडिगोने केली होती. मात्र, नवी दिल्ली विमानतळ प्राधिकरणाकडून कंपनीला ‘स्लॉट्स’ उपलब्ध होऊ न शकल्यामुळे या सेवेसाठी नाशिककरांना ही सेवा लवकर मिळणार नाही. त्यामुळे 29 ऑक्टोबरला मिळणारी सुविधा आता कधी सुरु होणार ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.