Mobile Data वाचवायचा आहे? WhatsApp मधील ‘हे’ Setting बदला

mobile data saver
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया यांसारख्या देशातील आघाडीच्या टेलीकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. आधीच महागाईने हैराण झालेला माणूस आता मोबाईल रिचार्जच्या वाढत्या किमतींनी चांगलाच मेटाकुटीला आलाय. मात्र मोबाईल रिचार्ज आणि त्यातून मिळणाऱ्या इंटरनेटशिवाय मोबाईल वापरणं आजकाल शक्यच नाही. कारण इंटरनेटच्या माध्यमातूनच आपण आपली अनेक कामे घरबसल्या करू शकतो. अशावेळी कमी पैशाचा रिचार्ज करून पुरेल असा रिचार्ज प्लॅन मारण्याचा ग्राहकांचा कल आहे. मात्र इंटरनेट डेटा नेमका वाचवायचा तरी कसा? हे तुम्हाला माहितेय का? चला तर मग आज आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर सांगतो.

तुम्ही जर व्हॉट्सॲप (WhatsApp) वापरत असाल तर यातील काही सेटिंग चेंज करून तुम्ही तुमचा इंटरनेट डेटा वाचवू शकता. व्हाट्सअप हे जगातील सर्वात लोकप्रिय असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून तुम्ही व्हाट्सअपच्या माध्यमातून फोटो- विडिओ शेअर, व्हॉईस-व्हिडिओ कॉलिंग आणि फाइल शेअरिंग करू शकता. व्हाट्सअप हे जवळपास सर्वांच्याच मोबाईल मध्ये असल्याने आणि सर्वात जास्त वापरात असणारे अँप असल्याने यासाठी अनेक वेळा जास्त इंटरनेट डेटा खर्च होतो. मात्र यात असे काही सेटिंग आहेत ज्यात बदल केल्यास तुम्ही तुमचा इंटरनेट डेटा वाचवू शकता. महत्वाची गोष्ट म्हणजे व्हॉट्सॲप वापरण्यासोबतच युजरला डेटा सेव्ह करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे. तुम्ही व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलसाठी WhatsApp वापरत असल्यास, तुम्ही Low Data Usage Mode करू शकता. या मोडमध्ये, कॉलिंगचा अनुभव पूर्वीसारखाच राहतो, परंतु डेटाचा वापर बऱ्याच प्रमाणात कमी होतो. हा मोड अशा प्रकारे इनेबल करा- Settings>Storage And Data>Use Less Data For Calls

व्हॉट्सॲप यूजर्स हा अनेक ग्रुपचा भाग असतो. अशा स्थितीत अनेक वेळा मीडिया फाइल्स डाऊनलोड करून फोनमधील डेटाचा वापर सुरू होतो. अनेक वेळा अशा ऑटो डाऊनलोड फाईल्सही उपयोगी पडत नाहीत. आणि आपल्याला माहित नसतानाही अनेक अनावश्यक फोटो किंवा विडिओ आपोआप डाउनलोड होत असतात. परंतु तुम्ही या फाइल्स डाउनलोड होण्यापासून रोखू शकता. यासाठी व्हॉट्सॲपवरील मीडिया ऑटो-डाउनलोड सेटिंग बंद ठेवावी लागेल. तुम्ही ही सेटिंग अशा प्रकारे इनेबल करू शकता- Settings>Storage And Data>Media Auto download>When Using Mobile Data