महाराष्ट्रात राहुल गांधींच्या दौऱ्यात बदल : पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी                           राहुल गांधी यांच्या ‘भारत जाेडाे’ यात्रेत पहिल्यांदाच मध्यरात्री 2 वाजेपर्यंत मशाल यात्रा निघणार आहे. उद्या दि. 8 नाेव्हेंबरला शीख धर्माचे संस्थापक श्री. गुरुनानक देवजी यांची जयंती आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेच्या वेळेत काहीसा बदल करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

भारत जोडो यात्रेसाठी निघालेल्या सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी पृथ्वीराज चव्हाण यांनी पंढरपूर येथे फोनद्वारे संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांच्या सोमवार व मंगळवारच्या दौऱ्याची माहिती दिली. तेव्हा सातारा जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, प्रदेश सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील -उंडाळकर, कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, निवास थोरात यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, नांदेड येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, रणजितसिंह देशमुख यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते दाखल झाले आहेत. आज रात्री तामिळनाडू राज्यातून महाराष्ट्र राज्यात मशाल आणण्यात येईल. आज 9 वाजेपासून मध्यरात्री 2 वाजेपर्यंत मशाल घेऊन भारत जोडो यात्रा सुरू राहील. तर उद्या सकाळी 8 वाजता देगलूर येथून भारत जोडो यात्रा सुरू होईल. मध्यरात्री 12 वाजता गुरुद्वारात जाऊन खासदार राहुल गांधी हे दर्शन घेतील.