Char Dham Yatra : चार धामला जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या; तर होईल यात्रा सुफळ संपूर्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Char dham Yatra) हिंदू धर्मात चार धाम यात्रेला विशेष महत्व आहे. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी चारधाम यात्रा करावी, असे म्हणतात. मनाला अद्भुत समाधान देणाऱ्या या चारधाम यात्रेला यंदा १० मेपासून सुरुवात झाली आहे. चार धाम म्हणजे काय तर चार मंदिरे. ज्यामध्ये यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या देवस्थानांचा समावेश आहे. ही यात्रा जवळपास ६ महिने सुरू असते. लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने आणि आस्थेने ही यात्रा करतात. ही यात्रा पूर्ण करण्यासाठी बऱ्याच सुविधा उपलब्ध आहेत.

उत्तराखंड येथील चार धाम यात्रेसाठी एकतर पायी जावे लागते किंवा घोडे, खच्चरच्या मदतीने दर्शनासाठी जाता येतं. इतकेच काय तर काही भाविक अगदी हेलिकॉप्टरने सुद्धा ही यात्रा पूर्ण करतात. गेल्या काही वर्षांत चार धाम यात्रेची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळे आज लाखो भाविक या यात्रेत सहभागी होतात. दरम्यान, चार धाम यात्रा (Char dham Yatra) करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टींची तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. अगदी रजिस्ट्रेशन पासून कालावधीपर्यंत सर्व माहिती उपलब्ध असल्याशिवाय चार धाम यात्रा करणे कठीणच! म्हणून आज आम्ही तुम्हाला ही सर्व माहिती देत आहेत.

यात्रेसाठी बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन गरजेचे

चार धाम यात्रेसाठी जाताना सर्वात आधी भाविकांना बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. (Char dham Yatra) हे रजिस्ट्रेशन ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करता येते. तसेच उत्तराखंड पर्यटन विकास परिषद (UTDV) कडून रजिस्ट्रेशनसाठी टोल फ्री नंबर आणि व्हॉट्सअॅप नंबरदेखील जारी करण्यात आले आहेत. ज्यावर रजिस्ट्रेशन मोफत स्वरूपात होते. यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान प्रमाणपत्र आणि पासपोर्ट दाखवावे लागेल.

यात्रेला जाण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी आवश्यक

चार धाम यात्रा करणे सोपे काम नाही. कारण, या प्रवासातील रस्ते फार धोकादायक मानले जातात. उंच डोंगर, घनदाट जंगल अशी मनाला मोहनारी दृश्य दिसत असली तरी वाट मात्र खडतर आहे. (Char dham Yatra) त्यामुळे तुम्हाला शारिरीकदृष्ट्या फिट आसने गरजेचे आहे. यात्रा सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय चाचणी जरूर करून घ्या. तुम्ही पूर्णपणे निरोगी आहेत याची खात्री करून मगच प्रवास सुरु करा.

यात्रेला जाताना सोबत ‘या’ वस्तू जरूर घ्या

चार धाम यात्रेचा प्रवास करतेवेळी सोबत मेडिकल किट, शरीराला उर्जा देणारे पदार्थ, खाण्याचे सामान आपल्या सोबत असू द्या. तसेच रोख रक्कम, आयडी कार्ड, गरम कपडे, रेनकोड, छत्री, ट्रेकिंग स्टिक, ड्राय फ्रुट्स, स्नॅक्स, थर्मल बॉटल, पर्सनल हायजीनचे सामान (टुथब्रश, शॅम्पू, सॅनिटायझर, मॉइश्चरायजर) सोबत ठेवा.

‘या’ गोष्टींची काळजी घ्या (Char dham Yatra)

चार धाम यात्रा ही जितकी कठिण तितकी सुखद आहे. मात्र, यावेळी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. चार धाम यात्रेची सुरुवात ही हरिद्वार येथून गंगा स्नान करुन होते. इथे किमान १० दिवस दर्शनासाठी जातात. चार धाम यात्रेपैकी दोन मंदिरांना जाण्याचा मार्ग फार अवघड आहे. ही दोन मंदिरे म्हणजे केदारनाथ आणि यमुनोत्री. त्या तुलनेत बद्रीनाथ आणि गंगोत्री मंदिरांकडील प्रवास थोडा सोप्पा आहे. त्यामुळे चार धाम यात्रेला जर तुम्ही पायी जायचा विचार करत नसाल तर घोडा किंवा खच्चर शिवाय पालखीचा पर्याय निवडू शकता. अशावेळी एक गोष्ट लक्षात राहूद्या की, रजिस्टर्ट लोकांकडूनच घोडा किंवा खच्चर घ्याल. कारण त्यांचे रेट फिक्स असतात.

आणखी एक महत्वाचे असे की, चार धाम यात्रेला (Char dham Yatra) निघताना शरीर हायड्रेटड ठेवण्यासाठी दररोज कमीत कमी २ लीटर पाणी प्या. तसेच न्युट्रिएंट्सची कमतरता होणार नाही याची काळजी घेत फलाहार करा. डोंगर चढताना नेहमी नाकाने दीर्घ श्वास घ्या. यामुळे फुफ्फुसांना अधिक ऑक्सिजन मिळेल आणि तुम्ही लगेच दमणार नाही. यात्रेदरम्यान फास्ट फुड, जंक फुड, शुगर ड्रिंक्स, कॉफी, सिगरेटचे सेवन किंवा अधिक तळलेले तसेच मसालेदार जेवण करू नका. त्रास होऊ शकतो.

‘या’ लोकांनी करू नये चार धाम यात्रा

तज्ञ सल्ला देतात की, ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना हृदयविकार, अस्थमा, हाय ब्लड प्रेशर, मधुमेह सारखे आजार असतात. त्यामुळे अशा लोकांना चार धाम यात्रा करताना काळजी घ्यावी किंवा करू नये. (Char dham Yatra) तसेच गर्भवती महिलांनी देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि हेल्थ चेकअप करुनच चार धाम यात्रेला जावे किंवा टाळावे.