महागाई विरोधात काढण्यात आलेल्या सायकल रॅलीतील कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

0
57
Against inflation
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शुक्रवारी महागाई विरोधात दोन वेगवेगळ्या सायकल रॅली काढण्यात आल्या होत्या. याबाबत शहरात लागू असलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सेवादल आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही रॅली काँग्रेस सेवा दल आणि युवक काँग्रेसतर्फे काढण्यात आली होती.

काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्या उपस्थितीत शहागंज शहागंज येथील गांधी पुतळ्यापासून सायकल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या जमावबंदी न करण्याच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक सय्यद मोहसीन अली अझहर यांच्या फिर्यादीवरून 20 ते 25 जणांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुजफ्फर खान पठाण, पंकज ठोंबरे, गौरव जैस्वाल, नीलेश आंबेवाडीकर, जितेंद्र देहाडे यांच्यासह 25 ते 30 कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.यामध्ये अलताफ लतिफ पटेल, विलास औताडे, नीलेश पवार, डॉ. प्रल्हाद काळे, अरुण शिरसाठ यांच्यासह 25 ते 30 कार्यकर्त्यांचा समावेश असून दुसरी सायकल रॅली युवक काँग्रेसतर्फे गांधी पुतळ्या पासून जिल्हाधिकारी कार्यलयावर काढण्यात आली होती. त्याच बरोबर या रॅलीमध्ये उपस्थित राहिलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here