पुणे ते गोवा फ्लाइटने जा सुरु झालीये स्वस्तात मस्त डील ; जाणून घ्या डिटेल्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी! अद्यापही सुट्टीचा सिझन सुरु आहे. त्यामुळे तुम्हाला पुण्याहून गोव्याला जाण्याची सुवर्णसंधी आहे. गोवा फिरायचं स्वप्न आता अजिबात महागडं राहिलेलं नाही. विविध विमान कंपन्या पुणे ते गोवा अवघ्या ₹२३०० पेक्षाही कमी किमतीत फ्लाइट्स देत आहेत. सध्या ही संधी इतकी आकर्षक आहे की ट्रेनच्या फर्स्ट AC तिकीटाच्या तुलनेतही स्वस्त विमानप्रवास करता येतो.

ही आहेत फ्लाइट डील्स:

  • Akasa Air

१ जुलै २०२५: ₹२२३०

वेळ: सायं. ५:२५ पुणेहून – सायं. ६:३५ गोव्याला

२८ जून २०२५: ₹२२९९

  • FLY91 २८ जून २०२५: ₹२५०२
  • SpiceJet २९ जून २०२५: ₹२४९९

तर दुसरीकडे तुम्ही टर्नने जाण्याचा विचार करीत असाल तर ट्रेनचे फर्स्ट AC तिकीट ₹२३०० आणि त्याचा प्रवास वेळ सुमारे १२-१३ तास; तर फ्लाइटने केवळ १ तासात गोव्याला जात येते त्यामुळे वर दिलेल्या सवलतींचा फायदा तुम्ही घेऊ शकता.

गोवा – भारताचं पर्यटन रत्न!

गोवा म्हणजे केवळ बीच नाही, तर निसर्गसौंदर्य, संस्कृती, आणि ऐतिहासिक वारशाने समृद्ध असलेलं भारतातलं प्रमुख पर्यटनस्थळ.

प्रमुख आकर्षणं

  • बीचेस: बागा, कॅलंगुट, अंजुना, पालोलेम – जलक्रीडा, सनसेट, आणि पार्टीसाठी प्रसिद्ध
  • फोर्ट्स: अगोडा, चापोरा, तिराकोळ – छायाचित्रकारांचे आवडते ठिकाण
  • चर्चेस आणि मंदिरे: बेसिलिका ऑफ बॉम जीसस, मंगेशी मंदिर – ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व
  • नाईटलाइफ: गोवा म्हणजे भारताचं पार्टी हब – क्लब्स, बीच पार्ट्या, लाइव्ह म्युझिक
  • फूड: गोवन सी-फूड, पोई-ब्रेड, फिश करी-राईस – स्थानिक चव अनुभवण्यासाठी उत्तम

कोणता सिझन सर्वोत्तम?

ऑफ-सीझन (जून-ऑगस्ट): मान्सूनमध्ये गोवा हिरवागार होतो, गर्दी कमी असते आणि हॉटेल्स-फ्लाइट्स स्वस्तात मिळतात.
हाय सीझन (नोव्हेंबर-फेब्रुवारी): थंडीमध्ये पर्यटकांची गर्दी, पण हवामान उत्तम; बुकिंग आधी करा.

गोव्याची ट्रिप

प्रवासाची वेळ वाचवा
खर्च कमी करा
आणि गोव्याचा आनंद मनमुराद घ्या!

ही स्वस्त डील लवकरच संपण्याची शक्यता असल्याने त्वरित फ्लाइट्स बुक करा आणि गोव्याची रंगतदार सफर अनुभवायला निघा! बुकिंगसाठी Akasa Air, Fly91, SpiceJet च्या अधिकृत वेबसाइट्स किंवा इतर ट्रॅव्हल पोर्टल्सना भेट द्या.