Cheapest Electric Scooter : फक्त 50000 रुपयांत लाँच झाली इलेक्ट्रिक स्कुटर; देतेय 100 KM रेंज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण भारतात इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल लोकांना प्रचंड आकर्षण आहे. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करत आहेत. त्यातच दिसायला सुद्धा इलेक्ट्रिक गाड्यांचा लूक अतिशय आकर्षक असतो. परंतु इतर गाड्यांपेक्षा इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती कजास्त असल्याने अनेकजण इच्छा असूनही ती खरेदी करू शकत नाहीत. मात्र आता हीच बाब लक्षात घेऊन गुरुग्राम स्थित कंपनी लेक्ट्रिक्स EV ने फक्त 50000 रुपयांत नवी इलेक्ट्रिक स्कुटर (Cheapest Electric Scooter) लाँच केली आहे. खास बाब म्हणजे एकदा फुल्ल चीज केल्यानंतर हि इलेक्ट्रिक स्कुटर 100 KM रेंज देते.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना ही इलेक्ट्रिक स्कुटर BaaS म्हणजेच बॅटरी सारख्या सुविधांसह सेवा म्हणून उपलब्ध असेल. Lectrix हे भारतातील पहिले OEM आहे, जे EV वाहनापासून बॅटरी वेगळे करते आणि ग्राहकांना सेवा म्हणून देते. BaaS सेवेसाठी ग्राहकाला सबस्क्रिप्शन प्लॅन घ्यावा लागेल. या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरच्या स्वस्त किमतीमुळे सरकारी अनुदानांवर जास्त अवलंबून राहण्याची गरज नाहीशी झाली आहे, जे OEM आणि ग्राहक दोघांसाठी आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य उपाय सुनिश्चित करते अशी प्रतिक्रिया Lectrix EV चे बिझनेस अध्यक्ष प्रितेश तलवार यांनी दिली.

100 किलोमीटर रेंज – Cheapest Electric Scooter

कंपनीचा दावा आहे कि, एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर तब्बल 100 किलोमीटर पर्यंत अंतर आरामात करेल. तसेच स्कुटरचे टॉप स्पीड 50 किमी प्रतितास इतकं राहील. महत्वाची बाब म्हणजे या स्कुटरवर देण्यात येणाऱ्या बॅटरीवर लाईफटाइम वॉरेंटी कंपनीकडून देण्यात येत आहे. त्यामुळे बॅटरीची कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. इतर कोणतीही कंपनी अशाप्रकारे वॉरेंटी देत नाही. अवघ्या 49,999 रुपयांच्या एक्स शोरूम किमतीत लाँच करण्यात आलेली ही इलेक्ट्रिक स्कुटर नक्कीच सर्वसामान्य ग्राहकाला परवडेल (Cheapest Electric Scooter) यात शंका नाही.