Cheapest Flight Tickets : Wow!! फक्त 100 रुपयांत विमान प्रवास; कुठे आहे ऑफर??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cheapest Flight Tickets । मित्रानो, विमानातून प्रवास करणं कोणाला नाही आवडणार? प्रत्येकाला वाटत कि विमानातून हवाई सफर करावी आणि पर्यटनाचा आनंद घ्यावा, मात्र विमान तिकिटांच्या किमती पाहून अनेकजण इच्छा असूनही विमानप्रवास करू शकत नाहीत, मात्र आता चिंता करण्याची गरज नाही . आता तुम्ही अवघ्या १०० रुपयांत विमान प्रवास करू शकता. त्यासाठी अलायंस एअर (Alliance Air) एअरलाईन्सकडून खास ऑफर देण्यात येत आहे. ही ऑफर नेमकी काय आहे? या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही कुठून कुठपर्यंत विमानातून सफर करू शकता हे आज आपण जाणून घेणार आहोत.

स्वस्तात विमान प्रवास कुठून कुठपर्यंत – Cheapest Flight Tickets

अलायन्स एअरची स्वस्त तिकिटे वेगवेगळ्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. यातील खास गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वस्तात विमान तिकीट बुक करण्यासाठी महिनाभर आधी बुकींमग करण्याची गरज नाही. १-२ दिवस आधी तिकीट बुक केलं तरी सुद्धा तुम्ही अवघ्या १०० ते ४०० रुपयांत विमानप्रवास करू शकता. अलायंस एअरलाईन्सच्या ऑफर अंतर्गत शिलाँग ते गुवाहाटी दरम्यानची तिकिटे फक्त 100 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. या विमानप्रवासासाठी वेबसाईटवर ४०० रुपये तिकीट किंमत दिली आहे, मात्र यावर तुम्हाला ३०० रुपयांचा डिस्काउंट असल्याने तुम्ही फक्त १०० रुपयांत हा प्रवास करू शकता. या ऑफरद्वारे, देशातील लहान शहरांना जोडणे आणि परवडणारे प्रवास (Cheapest Flight Tickets) पर्याय उपलब्ध करून देणे हे अलायन्स एअरचे मुख्य उद्दिष्ट आहे.

किती आहे अंतर –

शिलाँग आणि गुवाहाटी दरम्यानचे अंतर फक्त ९० किमी आहे. परंतु यासाठी तुम्ही बसने प्रवास केला तर तुम्हाला 285 रुपये खर्च येईल तसेच दुचाकीवरून जरी जायचं म्हंटल तरी २०० रुपये मोजावे लागतील. मात्र अलायन्स एअरच्या ऑफरमुळे (Cheapest Flight Tickets) तुम्ही फक्त १०० रुपयात आणि ते सुद्धा विमानाने हा प्रवास करू शकता. Alliance Air ही Air India Limited ची पूर्ण मालकीची एअरलाइन असून भारत सरकारद्वारे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत लहान शहरांना जोडण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे