Cheapest Rent In Pune : पुण्यात ‘या’ भागात मिळतात स्वस्तात भाड्याने घरे

Cheapest Rent In Pune
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cheapest Rent In Pune : मुंबई नंतर पुणे हे राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. पुण्याला ‘ शिक्षणाची पांढरी ‘ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शिक्षणासाठी इथे येणाऱ्या युवकवर्गाची कमी नाही. शिवाय पुणे आता ‘IT हब’ म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. त्यामुळे नोकरी निमित्त सिंगल आणि कुटुंबासहित राहणाऱ्यांची संख्या सुद्धा इथे कमी नाही. त्यामुळे तुम्ही जर पुण्यामध्ये परवडणाऱ्या भाड्याच्या घराच्या शोधात असाल तर तुमचा शोध संपला म्हणून समजा… आज या लेखात आम्ही तुम्हाला पुण्यातील अशा भागांची माहिती देणार आहोत जिथे परवडणारी भाड्याची घरे उपलब्ध (Cheapest Rent In Pune) आहेत. चला तर मग जाणून घेऊया…

कात्रज

युवा विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी हे ठिकाण उत्तम आहे. पुण्याचा हा भाग NH-4 हायवेशी जोडला गेला आहे. हा रस्ता कोल्हापूर बेंगलोर हायवे ला जोडला जातो. या भागात किफायतशीर किंमतीमध्ये फ्लॅट उपलब्ध आहेत.(Cheapest Rent In Pune)

कात्रज मध्ये भाडे प्रति महिना

  • 1BHK-7200-8400
  • 2-BHK- 8000-15000
  • 3BHK- 15000-25000

धनकवडी

एकेकाळी गाव असलेलं धनकवडी आता सर्वसुविधायुक्त शहराप्रमाणे वसलेलं आहे. तुम्ही विद्यार्थी म्हणून पुण्यात शिकण्यासाठी आला असाल तर आसपास उत्तम महाविद्यालय आहेत. शिवाय मुख्य शहरात जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था सुद्धा चांगली आहे.

हा भाग देखील NH4 पासून जवळच जोडला गेला असून हा भाग देखील निसर्गरम्य असल्यामुळे अभ्यासासाठी धनकवडी (Cheapest Rent In Pune)चा पर्याय चांगला आहे. या भागात रूम शेअरिंग आणि PG ची सुद्धा चांगली सोय आहे. रूम्स चे भाडे देखील इतर शहरी भागाच्या तुलनेत परवडणारे आहे.

धनकवडी येथील रूम भाडे प्रति महिना

  • 1bhk-5800-20000
  • 2bhk-20000-25000
  • 3-bhk-20000-25000

वारजे

मुठा नदीच्या तटावर वसलेला हा पुण्यातला (Cheapest Rent In Pune) प्रसिद्ध भाग. हा भाग शहराच्या मुख्य केंद्रापासून 12 किलोमीटर दूर आहे. आधी कृषी क्षेत्रासाठी ओळखलं जाणारा वारजे आज विकसित भाग म्हणून ओळखला जातो वारजे कोथरूड हा भाग अध्यात्मिक दृष्टीने प्रसिद्ध आहे. पुण्यातील एनडीए प्रशिक्षण केंद्राच्या जवळच वारजे स्थित आहे. या भागामध्ये कमी किमतीत तुम्हाला भाड्याने घेण्यासाठी घर नक्कीच उपलब्ध होतील.

वारजे येथे भाडे प्रति महिना

  • 1 BHK -11000-16000
  • 2 BHK-15,000-20,000
  • 3BHK- 20,000-25,000

भोसरी

भोसरी हा पुण्यातील पिंपरी चिंचवड क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय भाग म्हणून ओळखला जातो. एक प्रसिद्ध औद्योगिक क्षेत्र आहे जिथे टाटा मोटर्स थरमॅक्स एमआयडीसी इत्यादी सहित आणखी काही उद्योग आहेत. ज्या व्यक्तींचा औद्योगिक क्षेत्राशी संबंध आहे त्या व्यक्तींनी या भागात घर घेण्यासाठी प्राधान्य द्यायला काहीच हरकत नाही.

भोसरी भागात भाडे प्रति महिना

  • 1BHK-9000-17000
  • 2BHK-17000-25000
  • 3BHK-25,000-30,000

लोहगाव

पुण्याच्या (Cheapest Rent In Pune) पूर्व भागामध्ये असलेले लोहगाव हे मोठ्या झपाट्याने विकसित होणारे क्षेत्र आहे. हा भाग पुणे अहमदनगर राजमार्ग आणि पुणे सोलापूर राज्य मार्ग ला जोडला जातो. येथे विमानतळ असल्यामुळे ज्या लोकांना वारंवार विमान प्रवास करावा लागतो त्या लोकांसाठी येथे घर घेणे उत्तम राहील.

लोहगाव येथे भाडे प्रति महिना

  • 1BHK-5000-10,000
  • 2BHK-10,000-15,000
  • 3BHK-15,000-20,000