Mahavitaran Recruitment 2024| महावितरणमध्ये 10 वी पाससाठी नोकरीची मोठी संधी, अशाप्रकारे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mahavitaran Recruitment 2024 | दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक नोकरीची चांगली संधी घेऊन आलेला आहोत. आजकाल असे होते की, दहावी पास झालेल्या व्यक्तींना नोकरी मिळत नाही. परंतु आता आम्ही एक सरकारी नोकरी घेऊन आलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची संधी मिळणार आहे.

यासाठी त्यांनी जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत त्यामुळे यासाठी लागणारे शिक्षणाची अट, वयोमर्यादा, अनुभव, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि रिक्त पदांची संख्या या सगळ्यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

विजतंत्री आणि तारतंत्री तसेच कोपा पदांच्या एकूण 26 रिक्त जागा आहेत. आणि या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज करण्यात येणार आहेत. कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी किंवा आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. 9 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत उमेदवारांना हे अर्ज करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावे.

तुम्हाला जर यासाठी अर्ज करायचे असेल तर तुम्ही अधिकृत महावितरणच्या वेबसाईटवर जाऊन हा अर्ज करू शकता आणि तिथे सविस्तर माहिती मिळू शकता.

तुम्ही हा अर्ज भरला त्याच्यासोबत असणारे आवश्यक कागदपत्र देखील स्कॅन करून भरायचे आहे. आणि हा अर्ज भरल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला तुमच्या मेलवर किंवा फोन नंबरवर परीक्षा कधी आहे. याची माहिती दिली जाईल. त्याचप्रमाणे तुमचे आय कार्ड आणि इतर माहिती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मिळेल आणि त्यानंतर परीक्षाबाबतची सविस्तर माहिती मिळेल.