13 OTT चे फ्री सबस्क्रीप्शन आणि अनलिमिटेड डाटा; पहा JIO चा हा जबरदस्त प्लान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या OTT प्लॅटफॉर्मवर वेब सिरीज पाहण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळेच सिरीज चाहत्यांसाठी Jio कंपनीने एक उत्तम प्लान ऑफर केला आहे. या प्लॅनअंतर्गत तुम्ही मनोरंजनाचा कोणत्याही अडथळ्याशिवाय आनंद घेऊ शकता. तसेच या प्लानसाठी तुम्हाला जास्त पैसेही मोजावे लागणार नाहीत. या प्लानमध्ये तुम्हाला इतर अनेक गोष्टींचा लाभ घेता येईल. त्यामुळे हा प्लान नक्की किती रुपयांचा आहे, यामध्ये कोण कोणत्या सुविधा मिळतील जाणून घ्या.

तुम्हाला जर कमी किमतीत OTT प्लॅटफॉर्मचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही जिओच्या 1199 रुपयांच्या प्लॅनचा नक्कीच विचार करू शकता. या प्लानमध्ये तुम्हाला 13 OTT चे फ्री सब्सक्रिप्शन देण्यात येत आहे. तसेच 5G डेटासह तुम्ही सहा किंवा बारा महिने या प्लान लाभ घेऊ शकता. जिओचा हा जबरदस्त प्लान ग्राहकांना Jio Airfibre कडून देण्यात येत आहे. या प्लानमध्ये तुम्हाला Jio कडून इतर काही सुविधा देखील मिळत आहेत. ज्यामुळे तुम्ही पुढील वेळ पुन्हा याच प्लानचा विचार कराल.

JIO च्या प्लानमध्ये या सुविधा मिळणार

जेव्हा आपल्या ग्राहकांना 1199 रुपयांच्या प्लॅनमध्ये इंटरनेटचे 100Mbps स्पीड देत आहे. ज्यामुळे तुम्हाला सलग वेगवेगळ्या सिरीजचा आनंद घेता येईल. यासह प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड डाटा देण्यात येत आहे. यात तुम्हाला 550 हून टीव्ही चॅनेलचे मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे. यासह Netflix, Disney Plus Hotstar, Zee5 आणि 14 OTT प्लॅटफॉर्मची सदस्यता या प्लानअंतर्गत मिळून जाईल. इतकेच नव्हे तर, दररोज 100 SMS आणि 100Mbps इंटरनेट स्पीड तुम्हाला देण्यात येईल. या जबरदस्त प्लानमुळे तुम्हाला Disney Plus Hotstar, Sony LIV Jio Cinema, Jio Cloud आणि Jio TV सह 550 टीव्ही चॅनेल मोफत पाहता येतील.