अजित पवारांपेक्षा सुनेत्रा पवार श्रीमंत; एकूण संपत्ती पाहून व्हाल थक्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गुरूवारी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबरोबर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. हा अर्ज भरताना सुनेत्रा पवारांनी प्रतिज्ञापत्रातून आपल्या संपत्ती विषयीची माहिती सांगितली. यातूनच सुनेत्रा पवारांचे संपत्ती अजित पवारांच्या (Ajit Pawar) संपत्ती पेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. कारण की सुनेत्रा पवारांकडे एकूण, 12 कोटी 56 लाख 58 हजार 983 रुपये संपत्ती आहे. यात बँकेतील ठेवी, सोने, चांदी, गाड्या, जमीन अशा अनेक मालमत्तेचा समावेश आहे.

सुनेत्रा पवारांच्या हातात रोख रक्कम 3 लाख 36 हजार 450 इतकी आहे. त्यांच्या बँकेत ठेवीची एकूण रक्कम 2 कोटी 97 लाख 76 हजार 180 रुपये इतकी आहे. याउलट अजित पवारांच्या बँकेतील ठेवीची रक्कम 2 कोटी 27 लाख 64 हजार 457 इतकी आहे. यासह सुनेत्रा पवारांनी 15 लाख 79 हजार 610 इतकी रक्कम शेअर्समध्ये गुंतवली आहे. तर 56 लाख 76 हजार 877 रुपये बचत योजनेत गुंतवले आहेत.

सोने आणि चांदी, गाड्या किती?

सुनेत्रा पवार यांच्याकडे तब्बल 34 लाख 39 569 रुपये इतके सोने आणि चांदीचे दागिने आहेत. यासह 10 लाख 70 हजारांच्या गाड्या त्यांच्याकडे आहेत. यात एक ट्रॅक्टर आणि दोन ट्रेलरचा समावेश आहे.

स्थावर मालमत्ता किती आहे?

सुनेत्रा पवारांकडे 58 कोटी 39 लाख 40 हजार 751 रूपये इतकी स्थावर मालमत्ता आहे. ज्यात शेतजमीन आणि इतर जमिनीचा समावेश आहे. याउलट अजित पवारांकडे 37 कोटी 15 लाख 70 हजार 029 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्याचबरोबर, सुनेत्रा पवार यांच्याकडे 12 कोटी 56 लाख 58 हजार 983 रूपये इतकी जंगम मालमत्ता आहे. तर अजित पवारांकडे 13 कोटी 25 लाख 06 हजार 033 रुपये इतकी आहे.

कर्ज किती?

सुनेत्रा पवार यांच्यावर सध्या 12 कोटी 11 लाख 12 हजार 374 रूपये इतके कर्ज आहे. तर 4 कोटी 74 लाख 31 हजार 239 रुपयांचे कर्ज अजित पवारांवर आहे. सुनेत्रा पवार यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. परंतु अजित पवारांवर दोन गुन्हे दाखल आहेत. ही संपत्ती पाहता आपल्या लक्षात येईल की, अजित पवारांपेक्षा त्यांच्या पत्नी अधिक पॉवरफुल्ल आहेत.