हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संपूर्ण देशभरामध्ये येत्या 19 एप्रिल 2024 ते 1 जून 2024 या कालावधीत लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र आता काही विभागांकडून परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या तारखा नेमक्या कोणत्या आहेत? हे आपण पाहुयात.
JEE Main 2024
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) सत्र 2 च्या परीक्षांचे वेळापत्रक बदलले आहे. नव्या वेळापत्रकानुसार, JEE मेन 2024 परीक्षा 4 एप्रिल ते 12 एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहे.
MHT-CET (PCM AND PCB) EXAMS
16 ते 30 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आलेली MHT-CET (PCM Group) परीक्षा आता 2 ते 17 मे दरम्यान होणार आहे. तर PCB Group परीक्षा 22 ते 30 एप्रिल दरम्यान होईल.
TS EAPCET 2024
TS EAPCET 2024 परीक्षा ही येत्या 9, 10, 11 आणि 12 मे 2024 रोजी सकाळी 9:00 ते 12:00 आणि दुपारी 3:00 ते 6:00 अशा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे.
TS POLYCET
येत्या 17 मे होणारी रोजी TS POLYCET परीक्षा आता 24 मे 2024 रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 1:30 या वेळेत होणार आहे.
EAPCET 2024
आंध्र प्रदेश अभियांत्रिकी, कृषी आणि फार्मसी सामायिक प्रवेश परीक्षा (AP EAPCET) ही आंध्र प्रदेश राज्य उच्च शिक्षण परिषद (APSCHE) द्वारे सुधारित वेळापत्रकानुसार, 16 ते 22 मे 2024 दरम्यान होणार आहे.
UPSC CIVIL SERVICE EXAM
UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा ही येत्या 26 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र आता ती 16 जून 2024 रोजी नियोजित करण्यात आली आहे.
NEET PG 2024
NEET PG 2024 परीक्षा 23 जून 2024 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल 15 जुलै 2024 पर्यंत लागू शकतो.
ICAI CA Exam
ICAI CA इंटरमीडिएट परीक्षा आता 3, 5 आणि 9 मे 2024 रोजी गट 1 साठी आयोजित करण्यात आली आहे. तर 11, 15 आणि 17 मे 2024 रोजी गट 2 साठी ही परीक्षा घेतली जाणार आहे.
CUET UG Exam
CUET UG परीक्षा 15 ते 31 मे, 2024 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे, परंतु या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा विचार नॅशनल टेस्टिंग एजन्सी करत आहे.
JEE Advanced And NEET UG
JEE Advanced 2024 परीक्षा कोणत्याही बदलाशिवाय 26 मे 2024 रोजी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाईल. त्याचप्रमाणे, NEET UG 2024 5 मे 2024 साठी होईल.
KCET 2024 Exam
कर्नाटक कॉमन एंट्रन्स टेस्ट (KCET) 2024 18 आणि 19 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. या परीक्षेच्या तारखात अद्याप कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.