रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीत केमिकल कंपनीला आग,धुराचे प्रचंड लोट, लोकांची पळापळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील लोटे एमआयडीसीत पुन्हा एकदा कंपनीला भीषण आग लागली आहे. एम आर फार्मा ही कंपनी केमिकल कंपनी असून या कंपनीत स्फोट झाल्यानंतर आग पसरली आहे. आज सकाळी 11 वाजता ही दुर्घटना घडली आहे. या स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम सुरू आहे.

हा स्फोट इतका भीषण होता की स्फोटाच्या भीषण आवाजाने कंपनीच्या आजूबाजूचा परिसर हादरला असून अनेक कंपन्यांच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. धुराचे लोट आहेत. हे लोट इतके मोठे आहेत की दहा किलोमीटर अंतरावरून दिसून येत आहेत. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत या दुर्घटनेत अद्याप मृतांची माहिती उपलब्ध होऊ शकले नाही. घटनास्थळावर मदत कार्य वेगात सुरू करण्यात आले आहे.

,

लोटे एमआयडीसी मधील अपघाताची ही सहावी घटना मागील महिन्यात 20 मार्च रोजी लोटे एमआयडीसी मधील घरडा केमिकल कंपनी मध्ये भीषण स्फोट झाला होता. या स्फोटाची तीव्रता जास्त होती या स्फोटात चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता तर तीन जण जखमी झाले होते.

Leave a Comment