हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Chenab Railway Bridge Inauguration। जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज असलेल्या ‘चीनाब रेल्वे ब्रिज’ आणि भारतातील पहिला केबल-स्टेड ‘अंजी ब्रिज’ चे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं. मोदींनी चिनाब नदीवरील पुलाच्या डेकवर देशाचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगा फडकवला आणि रेल्वेचे उदघाटन केलं. यावेळी उदघाटनावेळी जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.
तत्पूर्वी चिनाब नदीवरील पुलाच्या उद्घाटन करण्याआधी (Chenab Railway Bridge Inauguration) मोदींनी रेल्वे आर्च ब्रिजची पाहणी केली. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतली आणि चर्चा केली. यूएसबीआरएल प्रकल्पावर काम करणाऱ्या कामगारांशीही यावेळी संवाद साधला.
J-K: PM Modi flags off two Vande Bharat Express trains from Katra to Srinagar
— ANI Digital (@ani_digital) June 6, 2025
Read @ANI Story | https://t.co/uGmvpxgFbj#JammuKashmir #kashmirontrack #Reasi #PMModi #vandebharat pic.twitter.com/SEmRkzA9iG
चिनाब नदीपासून ३५९ मीटर उंचीवर असलेला चिनाब रेल्वे पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे. हा १,३१५ मीटर लांबीचा स्टील आर्च ब्रिज आहे जो भूकंप आणि वाऱ्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी डिझाइन केलेला आहे. जम्मू आणि श्रीनगरमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यात या पुलाचा महत्त्वाचा परिणाम होईल. काश्मीरला देशाच्या उर्वरित भागाशी रेल्वेने जोडणाऱ्या या प्रकल्पाचे काम २०१७ मध्ये सुरू झाले होते. चिनाब रेल ब्रिजमुळे कटरा आणि श्रीनगर दरम्यानचा प्रवासाचा वेळ 3 तासांनी कमी होईल.
चिनाब रेल्वे ब्रीजची खास वैशिष्ट्ये – Chenab Railway Bridge Inauguration
चिनाब रेल्वे ब्रिज हा फ्रान्सच्या आयफेल टॉवरपेक्षा सुद्धा उंच आहे. आयफेल टॉवरची उंची ३३० मीटर आहे, तर चिनाब ब्रिजची उंची ३५९ मीटर आहे.
चिनाब रेल्वे ब्रिजची लांबी १३१५ मीटर आहे आणि रुंदी १३ मीटर आहे.
हा ब्रिज ताशी २६६ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा सामना करू शकतो.
तसेच, हा ब्रिज भूकंपीय झोन पाचमध्ये स्थित असून, रिक्टर स्केलवर 8 तीव्रतेच्या भूकंपालाही सहन करण्यास सक्षम आहे.
१२० वर्षांपर्यंत या ब्रिजला कोणताही धोका नसल्याचं बोललं जाते.
ब्रिज दरम्यान तब्बल ११२ सेन्सर बसवण्यात आले आहेत, जे वाऱ्याचा वेग, तापमान आणि कंपन इत्यादी माहिती देतील.
चिनाब ब्रिज उभारणीसाठी ३०३५० मेट्रिक टन स्टील वापरण्यात आले आहे.
१५० सर्व्हरच्या सुविधेसह सुसज्ज एक अत्याधुनिक नियंत्रण कक्ष बांधण्यात आला आहे.
हा पूल इतका मजबूत आहे की स्फोट झाला तरी त्याचे नुकसान होणार नाही.