हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Cheque Bounce New Rules । जर तुम्हीही एखाद्याला पैसे देण्यासाठी चेक वापरत असाल तर आताच आत्ताच सावध व्हा. सरकारने चेक बाउन्सशी संबंधित नियम आणखी कडक केले आहेत. सरकारच्या नवीन नियमांनुसार, जर तुमचा चेक बाऊन्स झाला, तर तुम्हाला पूर्वीपेक्षा दुप्पट दंड भरावा लागू शकतो. एवढेच नाही, तर तुमचे बँक अकाउंट गोठवले जाऊ शकते तसेच तुम्हाला थेट तुरुंगात जाण्यापर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे इथून पुढे कोणालाही चेक देताना तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम आहे का याची खात्री करा आणि चेकची प्रत्येक माहिती काळजीपूर्वक भरा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्याला चेक देते आणि खात्यात पुरेसे पैसे नसतात तेव्हा चेक “बाऊन्स” होतो. ही केवळ आर्थिक अनियमितता नाही तर चेक बाउंस होणे हे कायदेशीर गुन्ह्याच्या चौकटीतही येते. त्यामुळे चेक बाउन्सशी संबंधित समस्या गांभीर्याने घेत, सरकारने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट, १८८१ मध्ये मोठे बदल केले आहेत. १ एप्रिल २०२५ पासून हे नवे नियम लागू झाले आहेत. फसवणूक रोखणे, पेमेंट सिस्टम पारदर्शक करणे आणि तक्रारींचे जलद निराकरण करणे हाच या नव्या नियमांचा मुख्य उद्देश आहे. Cheque Bounce New Rules
काय आहेत नवे नियम? Cheque Bounce New Rules
1) पहिली गोष्ट म्हणजे इथून पुढे चेक बाउन्स झाला तर दुप्पट दंडाची तरतूद करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, जर चेकची रक्कम ₹५०,००० असेल आणि तो बाउन्स झाला तर दंड १ लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
2) दुसरी गोष्ट म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचे चेक वारंवार बाऊन्स होत असतील, तर त्याचे बँक खाते तात्पुरते गोठवले जाऊ शकते. यामुळे तुम्ही तुमच्या खात्यातून कोणतेही व्यवहार करू शकणार नाही.
3) तिसरी गोष्ट म्हणजे जर कोणी जाणूनबुजून चेक बाउन्स केला तर त्याला दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि चेकच्या रकमेच्या दुप्पट दंडाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय, न्यायालयात सुरू असलेल्या चेक बाउन्स प्रकरणांची सुनावणीही पूर्वीपेक्षा जलद होईल.
दरम्यान, आता चेक बाउन्सशी संबंधित तक्रारी ऑनलाइन करता येतात आणि डिजिटल पुराव्यांनाही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे तक्रार नोंदवणे सोपे होईल. सर्व बँकांसाठी हीच प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. म्हणजेच काय तर चेक बाउन्स प्रकरण कोणत्याही बँकेशी संबंधित असले तरी, कारवाई त्याच पद्धतीने केली जाईल. चेक बाउन्स झाल्यानंतर बँका आता खातेदार आणि चेक प्राप्तकर्त्याला २४ तासांच्या आत एसएमएस आणि ईमेलद्वारे कळवतील. तसेच, चेक का बाउन्स झाला याचे कारण स्पष्टपणे सांगितले जाईल.