BCCI चे चिफ सिलेक्टर चेतन शर्मा यांचा राजीनामा; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा हे त्याच्या मुलाखतीतील वक्तव्यानंतर चांगलेच चर्चेत आले. चेतन शर्मांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे बीसीसीआयवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या दरम्यान चेतन शर्मा यांनी स्वतः आज आपल्या निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट संघातील अनेक गोपनीय माहितीचा खुलासा केला होता. ज्यामुळे क्रिकेट विश्वात बरीच खळबळ उडाली होती. चेतन शर्मा यांची गेल्या महिन्यातच वरिष्ठ निवड समितीचे मुख्य निवडकर्ता म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली होती.

चेतन शर्मा यांनी भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष यांच्यात इगो प्रॉब्लेम झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे भारतीय संघाशी संबंधित गोपनीय निवड प्रकरणांची माहिती जगासमोर आली. यानंतर शर्मांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. बीसीसीआय या संबंधित खुलासा करून चेतन शर्मा यांना पदावरून दूर करेल याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तत्पूर्वी शर्मा यांनी आज आपलया पदाचा राजीनामा दिला.

चेतन शर्मा काय म्हणाले होते?

चेतन शर्मा यांच्यावर मंगळवारी एका वृत्त वाहिनेने मुलाखत घेतली. यामध्ये शर्मा यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. यावेळी शर्मा यांनी म्हंटले की, “देशातील अव्वल क्रिकेटपटू पूर्णपणे तंदुरुस्त नसताना देखील फिटनेस सिद्ध करण्यासाठी इंजेक्शन घेतात”. तसेच अनेक खेळाडू हे 80 ते 85 टक्केच फिट असताना इंजक्शन्स घेऊन व्यावसायिक क्रिकेटमध्ये लवकरात लवकर परतण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शर्मा यांनी केला. तसेच बीसीसीआयमधील अनेक गोपनीय गोष्टींचा देखील खुलासा त्यांनी केला होता.