महाविकास आघाडीच्या मोर्चाचं पुढचं पाऊल काय ? छगन भुजबळ यांनी स्पष्टच सांगितलं…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत आज विराट महामोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर हल्लाबोल करण्यात आला. सत्ताधारी पक्ष आंदोलन करून महामोर्चाला छेद देऊ शकत नाही. लोकांना सगळं कळतं आहे, कोणी आधी मोर्चा जाहीर केला, आधी कोण बोललं हे सगळं लोकांना कळतं आहे. महामोर्चा हे पहिलं पाऊल आहे. शेवटचं नाही. हे आंदोलन आक्रोश आहे. याची तीव्रता हळूहळू पाहायला मिळणार आहे. याचे पडसाद हळूहळू वाढत जातील. हिवाळी अधिवेशनात सुद्धा या आंदोलनाचे पडसाद पडतील, असे भुजबळ यांनी सांगितले.

छगन भुजबळ यांनी मोर्च्यात सहभागी होताच माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महा विकास आघाडीच्या मोर्चाची जास्त प्रसिद्धी होऊ नये, माध्यमांचे आणि लोकांचे लक्ष विचलित होऊ नये यासाठी भाजप माफी मांगो हे आंदोलन करून खटाटोप करत आहे. राज्यपाल यांच्यापासून मंत्र्यांपर्यंत चुका करत आहे, सरकार चुका करत आहे, आणि आम्ही काय माफी मागायची.

भाजपचा दिखावा आणि महामोर्चाचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपची नाटकं आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही आमची दैवत आहे. आणि त्यांचा अपमान होतोय हे आम्ही सहन करणार नाही.

महिविकास आघाडीच्यावतीने काढण्यात आलेल्या महामोर्च्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत, सपाचे अबू असीम आजमी, शेकापचे जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार विनायक राऊत, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप मोर्चात सहभागी झाले आहेत.