मराठा आरक्षणावरून जरांगेशी पंगा घेणं भुजबळांना भोवलं; जवळच्या नेत्यानं सोडली साथ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांशी पंगा घेण राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना चांगलच महागात पडलं आहे. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे एका जवळच्या नेत्याने त्यांची साथ सोडली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी या पदाचा राजीनामा देत भुजबळांना रामराम ठोकला आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रांतिक सरचिटणीस पदाचा देखील राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणाला भुजबळ विरोध करत असल्यामुळे आपण राजीनामा दिल्याचे होळकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. यामध्ये ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. परंतु जरांगे पाटलांच्या या मागणीला छगन भुजबळ यांनी विरुद्ध दर्शविला आहे. “मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आमचा त्याला विरोध नाही. पण ओबीसीतून त्यांना आरक्षण देऊ नये” अशी भूमिका भुजबळांनी मांडली आहे. यामुद्द्यावरून जरांगे पाटील आणि भुजबळांच्यात शाब्दिक वाद देखील सुरू आहे. मात्र आता जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध करणे भुजबळांच्या अंगलटी आले आहे.

भुजबळांचे समर्थक असणाऱ्या जयदत्त होळकर यांनीच त्यांची साथ सोडली आहे. होळकर यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पदाचा तसेच राष्ट्रवादीच्या प्रांतिक सरचिटणीस पदाचा आणि निफाड तालुका पूर्व 46 गाव तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा राजीनामा दिला आहे. छगन भुजबळ हे मराठा आरक्षणाला विरोध दर्शवत असल्यामुळे आपण हा निर्णय घेतला असल्याची माहिती होळकर यांनी दिली आहे. तसेच, “आता फक्त मराठा समाजासाठी काम करायचे आहे. आम्ही मराठा समाजाचा झेंडा हाती घेतला आहे” अशी भूमिका होळकर यांनी मांडली आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांच्या सर्वात जवळचे नेते म्हणून जयदत्त होळकर यांची ओळख होती. मात्र आता भुजबळ यांनी जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध केल्यामुळे होळकर यांनी भुजबळांची साथ सोडली आहे. ज्याचा मोठा धक्का भुजबळांना बसल्याची शक्यता आहे.