Chhagan Bhujbal Resign : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केल्यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध दर्शवत सरकार विरोधातच आक्रमक भूमिका घेतली. भुजबळ हे राज्य सरकार मध्ये मंत्री आहेत आणि अस असताना त्यांनी एकतर सरकार विरोधात भूमिका घेऊ नये किंवा घ्यायची असेल तर आधी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सरकार मधीलच नेते करत होते, मात्र आपण 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे असं म्हणत छगन भुजबळ यांनी सर्वाना चपराक दिली आहे. मात्र त्यावेळी नेमकं घडलं काय ते आज आपण जाणून घेऊया….
18 नोव्हेंबरला महत्त्वाची बैठक पार पडली- Chhagan Bhujbal Resign
16 नोव्हेंबर ला अंबड येथील ओबीसी मेळाव्याच्या आदल्या दिवशीच भुजबळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा (Chhagan Bhujbal Resign) दिला होता. भुजबळांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांमध्ये 18 नोव्हेंबर रोजी एक महत्त्वाची बैठक पार पडली होती.या बैठकीमध्ये छगन भुजबळ यांना राजीनामा मागे घेण्यासाठी विनंती करण्यात आली होती. तसेच तिन्ही मंत्र्यांकडून राजीनामा देऊ नये अशी विनंती करण्यात आली होती.
सध्याच्या परिस्थितीत छगन भुजबळ यांनी राजीनामा दिल्यास मंत्रिमंडळासाठी योग्य ठरणार नाही, त्याचबरोबर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगत त्यांनी राजीनामा देऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली. मात्र छगन भुजबळ यांनी आपला राजीनामा मागे घेतला नाही, उलट समाजासाठी मी आमदारकीचा सुद्धा राजीनामा देईल अस त्यांनी ठासून सांगितले…. सूत्रांच्या माहितीनुसार छगन भुजबळ यांचा राजीनामा अजूनही एकनाथ शिंदे यांच्या कडेच आहे.